पंढरपूर

कोरोनाच्या नावाखाली दुकाने,होटल बंद केली आहेत. मग निवडणूक प्रचारात गर्दी कशी” सौ.शैलाताई गोडसे.

सचिन झाडे
पंढरपूर –

गेली एक वर्ष पासून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढला असल्यामुळे संपूर्ण देशामध्ये लाँकडाऊन करण्यात आला. या कालावधीमध्ये सर्व व्यापारी दुकानदार, मजुरी करून खाणारे, तसेच हॉटेल व्यवसायिक या सर्व व्यापारी लोकांचे उदरनिर्वाहाचे हे उद्योगधंदे बंद केले गेले. या कालावधीमध्ये असंख्य लोकांना आर्थिक झळआणि मानसिक त्रास झाला आहे. आर्थिक संकटामध्ये हे सर्व व्यापारी सापडले असताना सरकारने पुन्हा एकदा कोरोना रोगाचा प्रसार होऊ नये, म्हणून लाँकडाऊन करण्यात आलेला आहे.
सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक लागली असून या निवडणुकीच्या कालावधीमध्ये प्रचार दौऱ्यावर असंख्य नेते प्रचारासभे साठी येत आहेत. त्यांच्या प्रचार सभेला प्रचंड गर्दी होत आहे .तर अशावेळी या प्रचार दौऱ्यामध्ये पोलीस जुजबी कारवाई केली जाते. आणि या नेतेमंडळीच्या प्रचार सभा या सध्या सुरू आहेत. या सभेला प्रचंड गर्दी होत आहे. मग या गर्दीमुळे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होत नाही का ?कोरोना रोगाचा फैलाव होत नाही का? व्यापाऱ्यांसाठी एक न्याय आणि नेते मंडळी च्या प्रचार सभेसाठी एक न्याय असे सध्या पंढरपूर शहरामध्ये तसेच मंगळवेढा शहरामध्ये दिसून येत आहे. तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी त्वरित हालाँकडाऊन उठवून शासनाने नियम घालून द्यावेत. या नियमाचे पालन जनता तसेच व्यापारी वर्ग हे देखील करतील कोरोनारोगा पासून काळजी घेणे बाबत खबरदारी घेऊन, काळजी घेऊन हे व्यापारी आपला व्यापार करतील. तरी या सर्व व्यापाऱ्यांना तसेच छोटे-मोठे व्यवसायिकांना त्यांची दुकाने उघडण्याची शासनाने परवानगी द्यावी. अशी मागणी करण्यासाठी आम्ही आज रोजी तहसील कार्यालय समोर लाक्षणिक उपोषण केलेले आहे. आमच्या या उपोषणाला जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैया देशमुख व त्यांचे सहकारी हेदेखील या उपोषणाला पाठिंबा देऊन ते आमच्या सोबत बसले आहे.अशी माहिती सौ शैलाताई गोडसे यांनी दिली.

Related posts