उस्मानाबाद 

शिवसेनेच्या वडगाव सि. विभागप्रमुख पदी मा. सरपंच अमोल मुळे यांची नियुक्ती.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) – जुनोनी ता. धाराशिव (उस्मानाबाद) येथील मा. सरपंच श्री. अमोल मुळे यांची वडगाव (सि.) विभागाच्या शिवसेना विभागप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेना धाराशिवचे तालुकाप्रमुख मा. सतिशकुमार सोमाणी यांनी नियुक्तीपत्र देत त्यांची नियुक्ती जाहीर केली.

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब, धाराशिव संपर्कप्रमुख आ. तानाजीराव सावंत, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, धाराशिव जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास पाटील यांच्या आदेशाने तालुका प्रमुख सतीशकुमार सोमाणी यांनी श्री जुनोनी मा.सरपंच अमोल मुळे यांची वडगाव सि विभागप्रमुख पदी नियुक्ती जाहीर केली. नियुक्ती दरम्यान त्यांचा सत्कार करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी व शिवसेना पक्षवाढी साठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शिवसेनेचे धाराशिव तालुकाप्रमुख मा. सतिशकुमार सोमाणी, वडगाव मा. विभागप्रमुख सौदागर जगताप, केशेगाव विभागप्रमुख मुकेश पाटील, आंबेजवळगे गणप्रमुख संदीप गोफणे यांच्यासह अनेक शिवसैनिक बांधव उपस्थित होते.

Related posts