उस्मानाबाद 

धाराशिव तालुक्यातील दाऊतपुर ग्रामपंचायत वर शिवसेनेचा भगवा

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

धाराशिव (उस्मानाबाद) तालुक्यातील दाऊतपुर येथील ग्रामपंचायत वर पंधरा वर्षानंतर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

दाऊतपूर येथील ग्रामपंचायत वर तब्बल पंधरा वर्षांनंतर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेना लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील तसेच तालुका प्रमुख सतीश सोमानी यांच्या मार्गदर्शनाखाली दाऊतपुर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

दाऊतपुर ग्रामपंचायत सरपंच पदी श्री बंकट शिंदे यांची निवड तर उपसरपंच पदी कानिफनाथ भांगे यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्यांचे यावेळी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य रुक्मिणी मदने,प्रवीण बनसोडे, रंजना ठवरे , पल्लवी थोरात व शिऊबाई भांगे उपस्थित होते.

Related posts