उस्मानाबाद  तुळजापूर

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलासदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

धाराशिव (उस्मानाबाद) शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा.श्री.आ.कैलास(दादा)पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर शिवसेनेच्या वतीने भव्य खुल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे (आमदार चषक – २०२१) आयोजन केले आहे.

प्रतिवर्षी आ.कैलास(दादा)पाटील यांचा वाढदिवस हा विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. प्रतिवर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. *कैलास(दादा)पाटील यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे ठरविले आहे. या वर्षी खिलाडू वृत्तीला प्रोत्साहित करण्यासाठी भव्य अशा खुल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत एकूण चार प्रमुख संघांना पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत.यामध्ये प्रथम क्रमांक पारितोषिक रू ३१०००, द्वितीय क्रमांक रू २१०००, तृतीय क्रमांक रू ११००० तर चतुर्थ क्रमांकाच्या संघाला रू ७००० पारितोषिक रक्कम आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये वैयक्तिक खेळाडूंना सुद्धा विविध प्रकारची पारितोषिके आयोजित करण्यात आलेली आहेत. यामध्ये मालिकावीर, सलग चार षटकार, सलग चार चौकार, सलग तीन विकेट, जलद अर्धशतक, उत्कृष्ट झेल यांसारख्या अनेक वैयक्तिक कलागुणांचा समावेश आहे.

या स्पर्धेत ठिकाण हंगरगा (तूळ)पाटी, ता. तुळजापूर मैदान येथे करण्यात आले आहे. स्पर्धेची सुरुवात दि. ०७/०२/२०२१ वार – रविवारी केले जाईल. ही स्पर्धा हंगरगा क्रिकेट क्लब, हंगरगा (तूळ) यांच्या संयोजनाखाली आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा. फारूक शेख – 9881798980, चेतन बंडगर – 9588447528, चेतन चव्हाण – 9623565644, सुरज चौगुले – 8459131447,सिद्धराम कारभारी – 9021583834, बळी कांबळे – 9011589864, अमीर शेख – 7499525826

या स्पर्धेचेचे आयोजन तुळजापूर शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मा.श्री. रोहित चव्हाण यांनी केले असून या स्पर्धेत तालुक्यातील जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवून या स्पर्धेची शोभा वाढवावी व लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख श्री.जगन्नाथ(दाजी) गवळी व शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री.रोहित नागनाथराव चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related posts