पंढरपूर

शिव मल्हार ब्रिगेड च्या मागणीला अखेर आले यश,– संजय पाटील,(संस्थापक शिव मल्हार ब्रिगेड अध्यक्ष )

पंढरपूर –
प्रशासनाने शिवराज्याभिषेक दिवस हा शिवराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्रात जाहीर केले आहे.गेल्या पाच-सहा वर्षापासून सातत्याने शिव मल्हार ब्रिगेड संघटनेची ही मागणी होती व स्वतः शिव मल्हार ब्रिगेड संघटनेचे सर्व कार्यकर्ते व संस्थापक अध्यक्ष संजय पाटील हे 6 जून हा दिवस राज्याभिषेक दिवस साजरा करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने या महाराष्ट्राला राजा लाभला म्हणून राज्याभिषेक दिवस हा शिवराज्य दिन म्हणून साजरा करावा अशी शासनाकडे ही मागणी केली होती

याला अखेर यश येत असल्याचे दिसते महाविकास आघाडीच्या सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे .महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातील निर्णय या सरकारने मान्य करण्याचे ठरवले आहे हा निर्णय ऐकून कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण व उत्साहाचे वातावरण आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांची भेट घेऊन ही मागणी केली होती..

तसेच महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली होती अखेर या चर्चेला यश आले आहे .

Related posts