अक्कलकोट

शिव -बसव डॉ.बी .आर आंबेडकर मागासवर्गीय सामाजिक संस्था अक्कलकोट च्या वतीने शिवजयंती साजरी

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –

बहुजन प्रतिपालक, स्वराज्य रक्षक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती संस्थेच्या वतीने संस्थेच्या संपर्क कार्यालय मध्ये साजरी करण्यात आली. अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अमोलराजे भोसले व श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना महेश इंगळे म्हणाले की, भूषण, बहुजन प्रतिपालक,स्वराज्य रक्षक रयतेचे राजे छत्रपती शिवरायांचे स्वप्न स्वराज्यातील प्रत्येकाचे शारीरिक आरोग्याचे रक्षण झाले तरच स्वराज्यातील संपूर्ण रयतेचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील सुदृढ आणि समृद्ध होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील शक्तीशाली बलदंड व आरोग्यदायी स्वराज्य साकार होईल, छत्रपतींच्या या स्वप्नपूर्तीकरिता निर्धाराने या कोरोना काळाच्या अंतिम टप्प्यात कोरोनाचे निर्दालन करून त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कर्तव्यदक्षतेने सर्व नियम पाळून या शिव जयंती दिनी आपल्या आरोग्याचा शत्रू कोरोनाचा पराभव करण्याची प्रतिज्ञा करू या असे विचार प्रकट केले.

यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष मनोज निकम, पत्रकार स्वामीराव गायकवाड, रमेश भंडारी , राजेश जगताप , लहुजी शक्ती सेना ता.अध्यक्ष वसंत देडे , शिवसेना शहर अध्यक्ष योगेश पवार , प्रवीण घाटगे ,भीमप्रकाश मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिलामणी बनसोडे , वंचित कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मडीखांबे , खंडू खंडाळे सर ,यादव होटकर, महेश घटकांबळे , बंटी नडगम ,गंगाराम वाघमारे , गंगाराम गायकवाड ,अमित दुपारगुडे ,प्रशांत मडीखांबे, समर्थ सुतार, आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडू खंडाळे यांनी केले तर आभार शीलामणी बनसोडे यांनी मानले.

Related posts