सोलापूर शहर प्रतिनिधी :
युवा सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य रुपेश कदम तसेच युवासेना राज्य विस्तारक विपुल पिंगळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच संपन्न झालेल्या मेळाव्यामध्ये सौरभ आष्टे यांची युवासेनेच्या सोशल मीडिया सेल अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.
सौरभ आष्टे यांनी आपल्या सोशल मीडिया च्या माध्यमातून आपल्या कर्तृत्ववाचा व पक्षप्रेमाचा ठसा उमटवला आहे. गेली कित्येक वर्षे ते सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह राहून शिवसेना पक्षाचे कार्य करत आहेत. याबरोबरच वरिष्ठ नेत्यांना व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. याचेच फलित म्हणून पक्षश्रेष्ठींनी त्यांना या पदाचा मान दिला अशी चर्चा युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
निवड झाल्यानंतर सौरभ आष्टे यांनी पक्षवाढीसाठी तसेच युवा सेनेच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले या निवडीबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक गणेश दादा वानकर यांनी अभिनंदन केले व व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा सेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यांच्या निवडीचे सर्व स्तरातील कार्यकर्त्यांकडून स्वागत होत आहे.