उस्मानाबाद 

स्वेरी अभियांत्रिकीच्या २३ विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी कंपनीमध्ये निवड

सचिन झाडे
पंढरपूरः-.

येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कॅपजेमिनी’ या आंतरराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्हीवमधून स्वेरीच्या २३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय कंपनी असलेल्या कॅपजेमिनी मध्ये स्वेरीच्या तब्बल २३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. कंपनीच्या निवड समितीने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त,आदरयुक्त संबंध व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेतून खुशाली चंद्रकांत राणे, स्मिता भरत यादव, संध्याराणी दत्तात्रय टेकाळे, अंजली महादेव यलसंगे, प्राची अवधूत माने, आयेशा लालासाहेब मुलाणी, श्वेता संजय विभुते, श्रद्धा सुहास तानवडे, कांचन दीपक टोणपे, सुकेशनी सत्यवान शिंदे, आदिती आबासाहेब घावटे, अश्विनी मधुकर देशमुख, अश्विनी लक्ष्मण चव्हाण, प्राजक्ता अशोक साठे, सायली शामराव कोळी, वृषाली राजेंद्र कोळी, अश्विनी केरप्पा साळुंखे, रोहित विष्णू नागटिळक, सुरज सिद्धेश्वर अरडक, पंकज औदुंबर शिंदे, अभिनव आनंद, अतुल कल्याणराव गुंड व आनंद गणपत माळी असे मिळून स्वेरीच्या एकूण २३ विद्यार्थ्यांची निवड कॅपजेमिनी कंपनीत करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या या निवडीमुळे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. एकूणच स्वेरीत मिळणाऱ्या संस्कारामुळे विद्यार्थी प्रगतीच्या दिशेने झेपावत आहेत. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रा. अविनाश मोटे , प्रा. आशिष जाधव व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related posts