शेतशिवार

लाळ्या खुरकत

लाळ्या खुरकत (f.m.d)

लाळ्या खुरकत (F.m.d- foot and mouth disease)

हा रोग गाय म्हैस,शेळ्या, मेंढ्या यामध्ये होणारा संसर्गजण्य रोग आहे या रोगाच्या विषाणूला मॅक्सीव्हायरस असे नाव आहे या व्हायरस चे 4 प्रकार असतात. A. O.C. & Asia-1 या 4 प्रकारात आढळून येते. या रोगाच्या एकूण 360 उपजाती आहेत.
#या रोगामध्ये जनावराच्या तोंडामध्ये बारीक बारीक फोड येतात. शारीरिक तापमान 104’ते 106′ पर्यन्त गेलेले अढळते.
#हा रोग साधारण ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत उधभवतो.
#या रोगाचा प्रसार आजारी जनावराच्या नाका तोंडातुन वाहणाऱ्या लाळेतुन हवेत पसरतात.
#आजारी जनावराचा चारा पाणी या द्वारे या रोगाचा प्रसार होतो.
#पायाच्या खुराच्या जखमेतील स्ट्राव या मार्फत या रोगाचा प्रसार होतो.

#) रोगाचा प्रसार मुख्तव खालील 2 प्रकारे होतो

1}हवेतून रोगप्रसार
2}पाण्यातून रोगप्रसार

#लक्षणे:-

1}सुरवातीला जनावराला 104’ते 106′ F पर्यन्त ताप येतो.
2}जनावर खाणे पिणे बंद करतात.
3}जनावर खाद्यअन्न खाल्यासारखं तोंड हलवते पाय झटकते.
4}जनावराच्या तोंडामध्ये लहान लहान फोड येतात.
5}जनावर काळवंडते व अशक्तपणा येतो तोंडातून लाळेचा फेस गळत असतो.
6}पायाच्या खुरांमध्ये लहान मोठे फोड येतात व ते फुटून जखमा होतात.
7}जनावर लंगडत चालते.
8}जनावर उन्हात दम धरत नाही.
९) जनावरांच्या जिभेवरिल फोड फुटुन जिभेचे सालपट (आवरण)निघून गेलेले आढळते.योग्य वेळी उपचार न झाल्यास तोंडातील व पयातील जखमामध्ये किडे पडलेले आढळतात.
१०) संकरित जनावरांमध्ये कासेमध्ये फोड येतात व जखमा होतात.
११) जनावरांची दूध उत्पादन क्षमता व प्रजनन क्षमता कमी होते.
१२) गर्भपात होण्याची शकता असते.
१३) हा रोग झालेले बैल शेती कामासाठी व प्रजननासाठी वापरले जात नाही.या रोगामध्ये मृत्यूचे प्रमाण २ ते ५% आहे.

*निदान:-
१)लक्षणावरून
२)प्रयोगशाळेत रक्ताचा नमुना पाठवणे
३)जखमेच्या फोडावरील द्रव ५०% ग्लिसरीन मध्ये मिसळा .

*प्रतिबंधात्मक उपाय:-
१) प्रतिबंधात्मक उपाय उपचारापेक्षा आधिक श्रेष्ठ आहे.
२) या रोगाचे प्रतिबंधक लसीकरण नेहमी ठरवून करावे.
३) रोगग्रस्त जनावर कळपातून काढून घ्यावे.
४) आजारी जनावराचा निरोगी जनावराबरोबर संपर्क येवू देवू नये.आजारी जनावराचा चारा ,खाद्य ,पाणी निरोगी जनावरांना देवू नये.
५) अनोळखी व्यक्तींना गोठ्यामध्ये प्रवेश देवू नये.
६) लसीकरण करावे.

१) व्होचेस्ट एफ.एम. डी. व्हसिन – डी एम एल
एस / सी. एल.ए. एस.ए – २ मिली
२) आय. व्ही . आर. टी. व्हसिन.-४००मिली
एस सी- १० मिली
३) बी.ए.आय.एफ व्हसिन

२) माऊथ वाॅश १% pp लोशन किंवा तुरटी
३) अॅसिड बोरीक पावडर -१ते२ भाग
ग्लिसेरी-४० भाग, पेस्ट तयार करून
कापसाने हळूवार जखमांवर लावावे.
ड्रेसिंग आॅईल
क्रियाझोट तेल १५ ते २० मिली
निलगिरी तेल ३० मिली
टरपेनटाईन -३०ते६० मिली
साधे तेल १ ली
वरील तयार केलेले ड्रेसिंग आॅईल कुठल्याही जखमेवर वापरता येते.
कशाही प्रकारचा फोड झालेला असल्यास या तेलाने बरा होतो.
सर्व प्रथम जखम पी.पी अँटिसेप्टिकअँटिसेप्टिक लोशनने धुवून घ्यावी.
वरील प्रकारची लोशन तोंडामध्ये व कानामध्ये वापरु नये. सुरूवातीला जनावर ४ महिन्याचे असताना लसीकरण करावे. त्यानंतर लसीच्या प्रकारानुसार ६ महिन्यानंतर किंवा १ वर्षांनंतर लसीकरण करावे.

* उपचार:-
१) हा रोग झालेल्या जनावरांचे तोंड पी.पी किंवा तुरटीने स्वच्छ धुवून घ्यावे.
२) बाेरीक अॅसिड पावडर २% ग्लिसरीन यांचे मिश्रण तोंडात लावावे.
३) बाहेरची जखम पी.पी किंवा डेटाॅलने साफ करावी. नंतर पातळ लांबट कोलयर गरम करून लावावे.
४) अँटिबायोटिक्स इंजेक्शन द्यावीत.
टेरामायसीन , मुनोमायसीन , पेनिसिलीन, क्लोक्सॅसिलिन, बॉक्सीवेट हे इंजेक्शन द्यावीत.

* पुरक आचार :-
१) विटॅमिन – ए
२) विटॅमिन – सी
३) बी-कॉम्प्लेक्स
४) अविल
५) डेक्स्ट्रोझ
जनावरांना मऊ चारा खाऊ घालावा. तसेच कोथिंबीर+लोणी एकत्र करून खायला दयावी.
६) विटॅमिन – ए इंजेक्शन द्यावीत
इंजेक्शन. प्रेपॅलिन फोर्ट
इंजेक्शन.आलॅसोल(डाॅग) ४ते६ मिली
७) विटॅमिन – सी इंजेक्शन द्यावीत
इंजेक्शन.redoxon ५ते१० मिली
८) विटॅमिन – बी- इंजेक्शन
बेलामिल
व्हिटेनॉल- एस.ए
लिव्होजेन- एल.ए १०ते१५ मिली
९) इंजेक्शन – डेक्स्ट्रोझ ४०० ते ५०० मिली
१०) इंजेक्शन- एविल १०मिली

Related posts