कविता 

वैज्ञानिक दृष्टिकोण

तोडून अंधश्रद्धेचा पाश
आता तरी बाहेर पडू या
नवीन ज्ञान विज्ञान
दृष्टीकोण समोर ठेवून
एकविसाव्या शतकात येऊया
अज्ञानावर विजय मिळवून
स्वातंत्र्याचा लाभ घेऊ या स्वाभिमानाने जगू या नवीन
तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ध्यास विज्ञानाचा घेऊया! जाणूनच ज्ञान-विज्ञान
पुढे वाटचाल करून
आपण सज्ज होऊ या
शत्रुशी करण्या दोन हात
आधुनिक तंत्र शिकु या!
शत्रुपासुन देशाला वाचऊ या
आपसातील मिटवून भांडणे
मनाला लागलेली अविचाराची
जळमटे काढू या!
नविन येणाऱ्या आजाराला
तोंड देण्यासाठी नवा
भारत घडऊ या!
शत्रुला हरवन्या सज्ज
होऊ या नवा भारत
घडऊ या।

=========================================================================

कवि
देविदास पांचाळ सर
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद।

Related posts