अक्कलकोट

सावित्रीच्या लेकींनी आत्मविश्वासाने पुढे यावे – प्रा. प्रकाश सुरवसे

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –
स्त्री शिक्षणाचा वसा घेऊन महिलांना सक्षम बनवण्यासाठी शेण-चिखलाचा मारा खात माता भगिनींच्या आयुष्यात नवी पहाट फुलवणाऱ्या सावित्रीच्या कष्टाचे सार्थक होण्यासाठी सर्वच क्षेत्रातील सावित्रीच्या लेकींनी आत्मविश्वासाने पुढे यावे असे आवाहन नेहरू युवा मंडळ अध्यक्ष प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले.

अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष माणिकराव बिराजदार हे होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त बोरगाव दे. येथे अंगणवाडी केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना माणिकराव बिराजदार म्हणाले, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करणे गरजेचे असून त्यासाठी स्थानिक नेतृत्वाने प्रयत्नशील राहावे. आम्ही सदैव सहकार्यासाठी तत्पर आहोत असे मत व्यक्त केले.

यावेळी सरपंच विलासराव सुरवसे, उपसरपंच राजेभाई मुजावर, काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष अब्दुल मकानदार, जकीउल्ला हिप्परगे, सचिन जिरगे, भागेश जिरगे, अंगणवाडी सेविका साळूबाई सुरवसे, कविता मठदेवरु, अंबिका शिंदे, मदतनीस सविता नडगिरे, व बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts