पंढरपूर

पंढरपूर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी.

सचिन झाडे
पंढरपूर / प्रतिनिधी
 
क्रांतीज्योती,ज्ञानज्योती, मुलीच्या पहिल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांची जयंती पंढरपूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदचे सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत व मा. उपनगराध्यक्षा सौ. लतिकाताई डोके यांची प्रमुख उपस्थितीत पार पडला. 

यावेळी मा.नगराध्यक्ष वामनतात्या बदंपट्टे,लक्ष्मणराव शिरसट,उप नगराध्यक्ष अनिल अभंगराव,  मा.उपनगराध्यक्ष नागेश भोसले, पक्ष नेते गुरुदास अभ्यंकर, नगरसेवक सुजितकुमार सर्वगोड,संजय निंबाळकर,डि.राज सर्वगोड,विवेक परदेशी, ॲड. कीर्तीपाल सर्वगोड,संतोष सर्वगोड,नानासाहेब वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके,योगश गाडेकर, बसवेश्वर देवमारे  तसेच पंढरपूर शहरातील  सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts