Blog उस्मानाबाद  तुळजापूर

“सार्थ अभिमान सावित्रीच्या लेकीचा” – हंगरगा (तूळ) येथील रुपालीताई चव्हाण यांची संघर्षकहानी

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय प्रतिनिधी – मराठवाडा

– मराठवाडा म्हटलं कि प्रत्येक गोष्टीतला मागासलेपणा डोळ्यासमोर चटकण उभा रहावा अशी परिस्थिती.पण याच परिस्थितीतुन तावूण सलाखुन विविध क्षेत्रात स्वताला सिद्ध करणार्‍या माणसांची इथं कमी नाही हेही तितकच खरं.महाराष्ट्रासह देशातील विविध क्षेत्रात मोठ्या पदावर सेवा देणारी व नेतृत्व करणारी कित्येक उदाहरणं याच मराठवाड्याच्या मातीत जन्मलेली.

रूपाली नागनाथराव चव्हाण मुळची हंगरगा(तुळ) तालुका तुळजापुर येथील एका सामान्य कुटुंबात जन्म घेऊन विपरीत परिस्थितीचा सामना करत स्वताला सिद्ध करून महाराष्ट्र पोलीस प्रशासनात मुंबई येथे सेवा देत आपल्या आई वडीलांचे व गावाचे नावलौकिक करणारी एक सावित्रीची कर्तव्यदक्ष लेक.

रूपाली ताई यांची घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांना शिक्षणासाठी आपले आजुळ लोहारा येथील आजी आजोबांचा सहारा घ्यावा लागला. आजी आजोबांच्या सोबत राहुन त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पुर्ण केलं.शालेय जिवणात अभ्यासाबरोबरच क्रिडा क्षेत्रात त्यांचा जास्त रस होता.धावणे स्पर्धेत त्यांचा सहभाग आग्रहाणे आसायचा व तालुका जिल्हा स्तरापर्यंत विजेता म्हणुन क्रमांक सुद्धा त्यांचा ठरलेलाच असायचा.यातुनच त्यांना क्रिडा क्षेत्राविषयी आवड निर्माण झाली. व यातुनच करिअर करायचं व स्वताला सिद्ध करण्याचा आत्मविश्वास त्यांना बालमनात घर करून राहिला.त्या दृष्टीने त्यां वाटचालही सुरू झाली.12 वी पर्यंतचे माध्यमीक शिक्षण पुर्ण झाले व रूपाली ताई यांनी मैदानातील आपले कौशल्याचा आधार घेत पोलीस भरतीचे तयारी सुरू करण्याचा निर्णय घेतला पण दुर्दैव असे कि घरची परिस्थितीत बेताची असल्याने त्यांचे 12 वीचा निकाल लागल्याबरोबर लग्न झाले. त्यांची स्वप्न त्यांचे प्रयत्न यांना पुर्णविराम लागला. ईच्छा नसताना पण परिस्थितीने ताटात वाढलंय ते रूपाली ताईंनी स्विकारलं अगदी मन मारून तसा ईलाजही नव्हताच म्हणा.

लग्नानंतर मध्यंतरिचे चार पाच वर्षे असेच लोटली एक मुलगा व एक मुलगी असा दोनांचा चार असा परिवार झाला. दिवसांमागुन दिवस जात होते पण आपले अपुर्ण शिक्षण व अधुरं स्वप्न याची सल मनात कायम बोचत होती. अजुन स्वप्न जिवंत होत फक्त संसारापुढं ईलाज नव्हता म्हणून त्याला खत पाणी घालणं शक्य नव्हतं..पण एके दिवशी रूपाली ताईंनी आपल्या मनातील हे स्वप्न आपले मोठे बंधु रविंद्र नागनाथराव चव्हाण यांच्यासमोर मांडलं तसा मोठ्या भावाचा सपोर्ट मिळताच त्यांचा आनंद द्विगुणित झाला.आता हिच ती वेळ म्हणत संधीच सोनं करण्याचं ठरवले.

पोलीस भरतीची तयारी सुरू झाली.अभ्यास मैदान या गोष्टीना संसारगाड्याचा भाग बनवला.रविंद्र भाऊनेही जबाबदारी पार पाडत वेळोवेळी मार्गदर्शन करत राहिले.पोलीस भरतीचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला पण जिद्द मोठी होती ति एका अपयशापुठं झुकणारी नव्हती.प्रयत्न सुरूच राहिले.

अभ्यास मैदान..मैदान अभ्यास या दोन गोष्टीनी त्यांच्या दैनंदिन जिवण व्यस्त झाले. “करो या मरो” ची वेळ होती कारण वेळ जास्त शिल्लक नव्हता इतरही जबाबदार्या समोर उभ्या होत्या.परिस्थितीची जाणीव होती तसा प्रयत्नही वाढवला.त्याच कालावधीत पोलीस भरतीची जाहिरात निघाली.भरतीची प्रक्रिया पुर्ण झाली तसं त्यांचं निकालाकडं लक्ष लागलं पण या वेळेसचा आत्मविश्वास भरपुर होता.अन् तो आत्मविश्वास खरा ठरला निकाल लागला पोलीस भरतीत गुणवत्ता यादीत नाव आलं व स्वताला सिद्ध करत मैदानातुन आपली ओळख निर्माण करणाऱ्या या वाघिणीने मैदानातुनच एक महाराष्ट्र पोलीस प्रशासनाचा एक भाग बनत स्वताची ओळख सर्वांना करून दिली.अडचणी आल्या,सकटं उभी राहिली,परिस्थिती विरोधात गेली पण रूपाली ताई ठाम होती स्वताला सिद्ध करण्यासाठी अंगी जिद्द अन् मनात स्वताचं जिवंत स्वप्न घेऊन.

पण म्हणतात ना “मंजिले उन्ही को मिलती है जिनकी सपनों मे जान होती है.. पंखो से कुछ नही होता साहब उडाण हौसलों से होती है” भायखळा कारागृह मुंबई येथे आज उत्तम सेवा देत महाराष्ट्र शासन व जनतेची सेवा करणारी हि जिजाऊंची लेक कोरोणा सारख्या महाभयंकर काळात प्रशासनाने सोपवलेली जबाबदारी चोख बजावत राहिली.अन् त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत त्यांना मुंबई जिल्हा महिला कारागृह यांच्या वतिने “कोरोना योद्धा” म्हणून गौरवण्यात आले.सर्वत्र त्यांचा गौरव झाला.

खरचं रूपाली ताई नुसत्या कोरोणा योद्याचं नाहित तर एक वास्तविक जिवणातील संघर्षमुर्ती सुद्धा होत कारण वैयक्तिक आयुष्यातील येणार्या प्रत्येक परिस्थितिशी लढुन त्यावर विजय मिळवणारी एक रणरागिणीचं आहेत.आज त्यांचे हे यश पाहुन गावकरी व मित्रपरिवारातुन समाधान व्यक्त होत आहेत शिवाय ग्रामीण भागातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलींसाठी त्या आदर्श आहेत. आज त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे लहान बंधु रोहित नागनाथराव चव्हाण यांनी सामाजिक क्षेत्रात स्वताला झोकुन देत कार्य करत आहेत.

धन्य ते आई वडील ज्यांनी रूपाली ताई या सारख्या कर्तृत्वान मुलींना जन्म दिला व धन्य ते रूपाली ताई यांचे भाऊ ज्यांनी सहकार्याची ढाल बनुन साथ दिली व धन्य ति रूपाली नागनाथराव चव्हाण ज्यांनी एवढ्या सर्वांचा विश्वास सार्थ ठेवत एक सावित्रीची यशस्वी लेक म्हणुन स्वताला सिद्ध केलं.

Related posts