Blog

आधुनिक काळातील शिक्षण क्षेत्रातील सरस्वती- – –

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विशेष लेख- – –
==============================================================================

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद।

===============================================================================

आज 3 जानेवारी 2021 नवीन वर्षाची नवीन सुरुवात आधुनिक काळातील सरस्वती शिक्षण सम्राज्ञी क्रांतीज्योती शिक्षण क्षेत्रातील अखंड तेवत राहणारी ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई फुले होय महात्मा ज्योतिराव फुले यांच्या त्या पत्नी होत महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या विना शिक्षण, महिला शिक्षण किंवा शाळा ही पोरकी आहे असं म्हटलं तर काही नवल नाही.

महाराष्ट्रातील पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून ज्यांना बहुमान मिळाला अशा या महान क्रांति ज्योति यांची आज जयंती आजच्या या शुभदिनी सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन! शिक्षण क्षेत्रातील आधुनिक सरस्वती म्हणून देशभर ज्यांचा गौरव केला जातो त्या सावित्रीबाई ज्यांनी आपल्या समाजातील, देशातील तळागाळातील स्त्रियांनी मुलींनी शिकले पाहिजे शाळेत गेले पाहिजे जे त्यांना लिहिता वाचता आले पाहिजे यासाठी जीवाचा आटापिटा करून आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहाय्याने पुणे येथील भिडे वाड्यात अठराशे 48 मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली व स्त्री शिक्षणाचा पाया रचला.

समाजाचा विरोध, जाती धर्माचा विरोध, इंग्रजांचे राज्य, परकीय सत्ता, जाच जुलूम एवढंच नाही तर आपलीच माणसे ,आपलीच नाती, घरची मंडळी शत्रू बनून घराबाहेर काढली का तर तू शिक्षण बंद कर, शाळा बंद कर, शाळेत जाणे व शिक्षण घेणे हे आपल्या संस्कृतीला धर्माला पटणारे नाही स्त्रियांनी फक्त चूल आणि मुल सांभाळायचे असते अशी आपली परंपरा आहे संस्कृती आहे म्हणून त्यांना त्यावेळी अनपेक्षीत हाल सोसावे लागले मानसिक छळ तो वेगळाच घरातील छळ तो वेगळाच वरून आपणा सर्वांनी वाचलेला आहे व ऐकलेलं ही आहे की शाळेत जाताना त्यांच्या अंगावर दगड माती चिखल एवढेच नव्हे तर शेण देखील फेकत असत व त्यांचा अवमान केला जात असे अक्षरशहा ते जाताना सोबत एक पिशवी घेऊन जायच्या त्यात दुसरी साडी असायची व शाळेत गेल्यानंतर ते दुसरी साडी परिधान करीत असत हा झाला मानसिक व शारीरिक अन्याय अत्याचाराचा कळस महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी समाजाचा अभ्यास केला त्यांच्या असे लक्षात आले की समाज हा अज्ञानी आहे अडाणी आहे अंधश्रद्धेच्या खाई मध्ये गुरफटून गेलेला आहे, अंधविश्वासु आहे या समाजाला आज खरी गरज ही शिक्षणाची आहे त्यांना नवी दिशा नवीन वाट दिली पाहिजे पुरुषप्रधान कुटुंब पद्धती आहे पुरुष आपले वर्चस्व सोडायला तयार नाही महिलांना घराच्या आतच राहावे लागते तेव्हा पुरुषापेक्षा स्त्रीला शिक्षण देणे ही काळाची गरज आहे ती अबला आहे ही स्त्री ही सक्षम सबला व स्वावलंबी बनली पाहिजे तिला घरातून बाहेर पडलेच पाहिजे म्हणून स्त्री शिक्षणाची संकल्पना सावित्रीबाईंच्या मनात आली व त्यांनी शिक्षणाचे कार्य जोमाने सुरू केले स्त्री साखर तर संपूर्ण घर साक्षर शिकलेली आई घराला दारांना पुढे नेही असे शिक्षणाचे महत्व समाजाला समाजात रुजविण्याचे मोठे कार्य त्या करू लागल्या.

शिक्षण हे एक शस्त्र आहे शिक्षण हे एक शास्त्र आहे आणि ते हे अज्ञान ए अंधश्रद्धाळू बडाने समाजावर प्रभावी औषध आहे म्हणून समाजातील तळागाळातील दिन दुबळ्यांचा साठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे व त्यांनी शिक्षण घेतलेच पाहिजे अशी त्यांची भूमिका होती फुले कुटुंब म्हणजे माळ्याची परंपरा त्यांच्या घरी विविध फुलांचे हार बनवले जात असत व विकली जात असे ज्याप्रमाणे फुलांचा सर्वत्र सुगंध दरवळतो त्याच प्रमाणे सर्वत्र शिक्षणाचा सुगंध ज्ञानाचा सुगंध संस्कृतीचा सुगंध दरवळला पाहिजे म्हणून त्यांनी शिक्षणाची सुरुवात केली येवले से रोप लावियेले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी अशाप्रकारे हळूहळू त्यांच्या शाळा वस्तीगृह वाढू लागले व समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटू लागले सुरुवातीला दोन-तीन मुलींच्या या शाळेत आता शेकडोंनी मुलींची संख्या वाढू लागली दैदिप्यमान कार्याने हळूहळू समाजातील विरोध उतरू लागला हेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे खरे यश होय.

सावित्रीबाई या स्वतः शिक्षण घेऊन पुन्हा त्या शिकवण शिकवण्याचे कार्य अध्यापनाचे कार्य करू लागल्या अशाप्रकारे त्या आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका बनल्या हे कार्य महिलांसाठी विशेष उल्लेखनीय असे आहे महिला शिक्षणाचा भक्कम पाया रचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना आपण कधीही विसरू शकणार नाही आज विविध क्षेत्रात आघाडीवर कार्य करणाऱ्या स्त्रिया मग त्या शिक्षिका मुख्याध्यापक असतील किंवा पायलट वैज्ञानिक संशोधक असतील डॉक्टर इंजिनिअर किंवा विविध क्षेत्रातील कर्मचारी असतील या सर्वांचे पुढे जाते ते सावित्रीबाईंना या आधुनिक सावित्रीच्या लेकी म्हणून त्यांचा गौरव सन्मान केला तरी काही नवल नाही अशा प्रकारे शिक्षण चळवळीची सक्रिय सुरुवात करून क्रांती करणाऱ्या महान महात्मे,
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या या महान कार्याला त्रिवार नमन . . . !

Related posts