Blog

संत तुकाराम बिज.

संत तुकाराम बिज निमित्त संताचा महिमा ———-

——————————————————————————————–

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवास राव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद।

—————————————————————————————————–
आज संत तुकाराम महाराजांची बीज आहे संत तुकाराम महाराज हे आपल्या महाराष्ट्रातील महान संत , महान श्रेष्ठ संत कवी व श्रेष्ठ समाजसुधारक होते त्यांच्या संत परंपरेतील कर्तृत्वाबद्दल बोलणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्या सारखे होईल तरीही त्यांच्या जीवनाविषयी भक्ती विषयी विठ्ठल प्रेमाविषयी शब्दरूपाने सेवा करण्याचा एक छोटासा केलेला प्रयत्न…

महाराष्ट्र ही पवित्र पावन संतांची भूमी आहे या पावन भूमीत संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत जनार्धन स्वामी, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार, संत सावता माळी, संत सेना न्हावी, संत गोरा कुंभार अशा महान संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे या महाराष्ट्रातील संत साहित्याचा महिमा, गोडवा, संत परंपरेचा वारसा लाभलेला आहे साडेसातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांपासून ते संत तुकाराम महाराजां पर्यंतचा काळ हा सर्व संतांनी समाजाला सुधारण्याचा प्रयत्न केला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला समाजाला अज्ञान अंधश्रद्धा यापासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला आपल्या विविध प्रकारच्या अभंगातून प्रवचन कीर्तनातून गवळण तसेच भारुडाच्या माध्यमातून लोकांना जागृत व शहाणे करण्याचा प्रयत्न केला

सातशे ते साडेसातशे वर्षा पूर्वीचा इतिहास अभ्यासला तर समाजाचे खरे स्वरूप आपल्याला कळेल काही धर्मांध लोकांनी संतांचा कसा छळ केला जीवनात त्यांना किती संघर्ष करावा लागला त्याना समाजापासून कसं वाळीत टाकलं गेलं समाजाने त्यांना कसे दूर केले हे समजते प्रत्येक संतांना त्यांच्या चांगल्या कार्यात खूप अडथळा झाला संत ज्ञानेश्वरांना संन्याशाची मुले म्हणून वाळीत टाकण्यात आले घरोघरी जाऊन भिक्षा मागून आपले पोट भरण्याचे काम करीत असत त्यांना लोकांनी भिक्षा सुद्धा दिली नाही सारखा अवमान अपमान अवहेलना यांना तोंड द्यावे लागले व लहान लहान आई वडीला विना पोरकी झालेली बालके रात्रंदिवस भटकत होती पण तीच माऊली आधुनिक जगाची आई झाली, जगाची माऊली झाली ,त्याकाळी समाजाला जागृत करण्यासाठी चमत्काराशिवाय नमस्कार नव्हता म्हणून संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेद बोलवला, तसेच निर्जीव भिंत चालवावी लागली, व चांगदेवा सारख्या महान तपस्वी ला अहंकारातून मुक्त करावे लागले जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे.

संत एकनाथ महाराजांना सुद्धा समाजाचा खूप छळ सहन करावा लागला होता तो प्रसंग सर्वांना माहिती आहे एका युवकाने महाराजांच्या नाथांच्या अंगावर पान खाऊन थूंकले होते असे एक नव्हे दोन नव्हे 108 वेळा घडले नाथांनी 108 वेळा आंघोळ केली व म्हणाले की तुझ्या मुळेच मला 108 वेळा स्नान घडले मी किती भाग्यवान आहे! संत तुकाराम महाराजांच्या जीवनात तर दुःखाचे डोंगरच दिसून येतात दुःखच दुःख दिसून येते लहानपणापासूनच संघर्षाला सुरुवात झाली व्यापार करता करता ते भजन-पूजन नामस्मरण किर्तन याकडे वळले महाराजांनी लिहिलेली गाथा ना टाळा कडून इंद्रायणीच्या डोहात बुडवण्यात आली पण पुढचा भाग आपण सर्वजण जाणतोच आहोत विठ्ठल भक्ती ने, विठ्ठलाचा धावा केल्याने ती गाथा जशीच्या तशी महाराजांना प्राप्त झाली

संत तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी संतांनी स्वतःला त्रास करून घेऊन समाजसुधारणेला समाज जागृती ला महत्त्व दिले व प्रत्येक वेळी समाज जागृती करण्याचा आटोकाटपणे प्रयत्न केला काही अंशी समाज सुधारलाही पण काही तसाच राहिला जो आज पर्यंत असाच आहे असुरक्षित आहे संत तुकारामांनी आपल्या अभंगातून अशा अज्ञानी अडाणी समाजाला प्रखरपणे जागृत करण्याचा प्रयत्न केला समाजातील नाठाळ लोकांना अभंगाच्या माध्यमातून चागलाच धडा शिकवला! प्रेमाने जग जिंकता येते विश्‍वास जिंकता येतो, विठ्ठलाच्या नामस्मरणाने शरीराचा ताप नाहीसा होतो, अहंकार गळून पडतो, कु विचार दुर्बुद्धी नष्ट होते, माणूस पापमुक्त व भयमुक्त होतो त्याला जीवनात कशाचीही चिंता काळजी वाटत नाही लोकांना जीवनाचा सत्कार्या याचा चांगला मार्ग दाखवणे व ध्येयापर्यंत पोहोचविणे हे संतांचे कार्य आहे

संतांनी जातीभेद वर्णभेद कधीच केला नाही हे विश्वची माझे घर ही शिकवण जगाला दिली संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आपण जाणून घेऊया “संत कृपा झाली इमारत फळा आली। ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया। नामा तयाचा किंकर ते ने केला हा विस्तार। जनार्धन एकनाथ ध्वज उभारिला भागवत। भजन करा सावकाश तुका झालासे कळस”।। संतांच्या कृपेने संताच्या कार्याने संत परंपरेचे इमारत फळा आली संत ज्ञानेश्वरांनी या भक्ती संप्रदायाचा पाया असलेला आहे व भक्तीचे देवालय उभारले आहे संत नामदेवांच्या कार्याने भक्तीने या संत परंपरेचा विस्तार झालेला आहे संपूर्ण जगामध्ये भक्ती संप्रदायाचा विठ्ठल भक्तीचा प्रचार प्रसार करणारे संत नामदेव महाराज तसेच संत जनार्दन स्वामी संत एकनाथ महाराज यांनी भागवत धर्माचा ध्वज संपूर्ण जगामध्ये उभारला व विठ्ठल भक्ती चा प्रसार केला भागवत धर्माचा प्रचार प्रसार या सर्व संतांनी केला या संत परंपरेचा संत परंपरेवर भक्तीचा कळस भक्तिमार्गाचा कळस चढविण्याचे अत्यंत मोलाचे कार्य संत तुकाराम महाराजांनी केलेले आहे

विठ्ठल भक्ती विठ्ठल नाम विठ्ठल सोहळा भजन किर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाजाची जनजागृती करण्याचं कार्य या सर्व संतांनी केलेला आहे आज 30 मार्च संत तुकाराम महाराज यांची पुण्यतिथी सदेह वैकुंठ गमन करणारे संत म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहेत जगाला चांगला संदेश देण्यासाठी जगाचे कल्याण करण्यासाठी जगाला सत मार्ग दाखवण्यासाठी विठ्ठल भक्ती करण्यासाठी व संत परंपरेला जपण्यासाठी आम्ही वैकुंठ आहून इथं आलेलो आहोत असं महाराज अभंगातून व्यक्त करतात आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी देहू पुण्यभूमि देहू येथे मोठ्या लाखो भक्तांच्या उपस्थित तुकाराम बीज चा नयनरम्य सोहळा पूर्ण होतो भक्तिमय वातावरणात सर्व भक्त मंडळी ज्ञानदेव तुकाराम या मंत्रघोषात जय घोषात टाळ मृदुगाच्या भजनात तल्लीन होतात विठ्ठलभक्तीत एकरूप होतात भक्ति रसात नहाऊंन जातात आनंदाने मोठ्या उत्साहाने व भक्तीने बीज उत्सव साजरा करतात.

“गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे” सतत नामस्मरण केल्याने भागवत कथा अखंड हरीचे चिंतन केल्याने आपले जीवन यशस्वी होते पापाचे डोंगर जळून जातात व पुण्याच्या राशी आपल्या नावे जमा होतात म्हणून सर्वांनी भक्ती मार्ग स्वीकारावा संत तुकाराम महाराजांनी सोप्यात सोप्या भाषेमध्ये आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवला आहे आजच्या या कोरोना महामारी च्या काळात सर्वांचे संकट दूर होऊन हा भयंकर कोरोणा विषाणु नष्ट व्हावा यासाठी आपण प्रार्थना करूया व आपले जीवन सुखी बनवू या संतांना शरण जाऊ या त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करू या संत तुकाराम महाराज म्हणतात संसाराचे ओझे वाहताना भगवंताला देखील सोबत घेतले पाहिजे प्रपंचात असताना हरी नामानेच आपला उद्धार होणार आहे म्हणूनच आपल्या जीभेने हरी नामाचा सतत उच्चार केला पाहिजे ही शरीर संपत्ती आपली नाही, ती काळाची आहे! देह हा काळाचा धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे! अचानक काळ कधीतरी येणार आहे व आपल्या शरीरावर घाला घालणार आहे काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप म्हणून जीवनात निष्काम पणे भगवंताची सेवा करावी ज्याप्रमाणे एक आई आपल्या बाळाची निष्काम सेवा करते तिला कुठलाही स्वार्थ नसतो एक गाय आपल्या वासराशी लळा लावतेअगदी तसंच आपल्याला भगवंताचे नामस्मरण करावे लागते।

Related posts