कविता 

संकल्प नवीन वर्षाचा

करु या संकल्प नववर्षाचा

दुर्गुण दुर्जनापासून
दूर राहण्याचा
वाईट व्यसनापासून
पाप कर्मा पासून
फसवेगिरी व धोका धडी
पासून दूर राहण्याचा
करुया संकल्प नववर्षाचा

कला-संस्कृती हुन्नर
आपला इतिहास कुटुंब परिवाराचे नाव जगात करण्याचा
करु या संकल्प नववर्षाचा

नवनवीन ज्ञान घेऊन
तंत्रज्ञान शिकून आकाशात झेप घेऊन देशाची मान जगात उंचावण्याचा
करुया संकल्प नववर्षाचा

व्यायाम योगा वॉकिंग
करून आपले आरोग्य
निरोगी राखण्याचा
दुसऱ्याला बळ देण्याचा
करु या संकल्प नववर्षाचा

साधू सुसंवाद एकमेकांना
राखू व्यवहार प्रेम व स्नेहाचा करून जवळ आप्तेष्टांना
आपला आनंद द्विगुणित करण्याचा
करुया संकल्प नववर्षाचा

कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

Related posts