उस्मानाबाद 

धाराशिव (उस्मानाबाद) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी ; तमाम धारशिवकरांचे स्वप्न साकार…!

निर्णय महत्वाचा, जन हिताचा…!

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री सन्माननीय ना. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल, धाराशिव(उस्मानाबाद) येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करण्यासाठी मंजुरी देण्यात आली.

धाराशिव (उस्मानाबाद)करांची अनेक वर्षांपासूनची मागणी महाविकास आघाडीच्या सरकारने प्रत्यक्षात उतरविली आहे. सततच्या पाठपुराव्यानंतर पर्यावरण मंत्री ना. आदित्यजी ठाकरे साहेब यांनी उस्मानाबादच्या महाविद्यालयासाठी पुढाकार घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित भैय्या देशमुख यांच्या समवेत बैठका घेतल्या होत्या. आदित्य साहेब व अमित भैय्या यांनी यात विशेष लक्ष घातल्याने प्रश्न मार्गी लागला. आता पुढची प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन धाराशिव (उस्मानाबाद) करांची आरोग्य सेवा समृद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरुच राहतील.

वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शन मा.केंद्रीय कृषी मंत्री तथा राज्याचे मा.मुख्यमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय मा.ना. अजित दादा पवार, महसूलमंत्री मा.ना.बाळासाहेब थोरात, पर्यावरण व राज शिष्ठाचार मंत्री ना.आदित्यजी ठाकरे साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.ना.अमित भैय्या देशमुख, मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.शंकरराव गडाख पाटील, मा.मंत्री तथा शिवसेना उपनेते प्रा.डॉ.आमदार तानाजीराव सावंत, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यद्रावकर, जिल्ह्याचे खासदार श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकर कळंब-धारशिवचे आ. मा. कैलास पाटील यांचे व महाविकास आघाडी सरकार मधील सर्व सहकाऱ्यांचे समस्त धाराशिव(उस्मानाबाद) जिल्हा वासियांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात येते आहे. तसेच संपूर्ण जिल्हाभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळताच धाराशिव(उस्मानाबाद) शहरात आनंदोत्सव साजरा

धाराशिव(उस्मानाबाद)येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व त्याला संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करण्यास मंजुरीचा निर्णय होऊन शिक्कामोर्तब झाल्याची वार्ता येताच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी व घोषणाबाजी करीत पेढे भरवून या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाल्यामुळे धाराशिव शहरात महाविकास आघाडीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे अनेक लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी खासदार ओमदादा राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष नंदू भैय्या राजेनिंबाळकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय पाटील दूधगावकर, गटनेते सोमनाथ गुरव, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अक्षय ढोबळे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, शिवसेना शहरप्रमुख संजय मुंडे, मा.शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, भीमा अण्णा जाधव, पंकज पाटील, उपशहर प्रमुख प्रशांत बापू साळुंके, मा.नगराध्यक्ष तथा नगरसेवक खलिफा कुरेशी, नगरसेवक बाळासाहेब काकडे, राजाभाऊ पवार, तुषार निंबाळकर, प्रदिप घोणे, हनुमंत देवकते, दीपक जाधव, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित पडवळ, उपशहर प्रमुख, बंडू आदरकर, उपशहर प्रमुख विजय ढोणे, युवासेना उपजिल्हाप्रमुख विजय राठोड यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख नेते, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

Related posts