पंढरपूर

समृद्धी ट्रॅक्टर्सने विक्रीत देशात तिसरा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला

(कोरोना काळातही एका वर्षात तब्बल ५११ ट्रॅक्टर्सची विक्री)

पंढरपूर प्रतिनिधी:
कोरोनाच्या महामारी असताना देखील पंढरपूरच्या समृद्धी ट्रॅक्टर्सने सोनालिका कंपनीचे तब्बल ५११ ट्रॅक्टर्सची एका वर्षात विक्रमी विक्री करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक तर देशात तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान पटकावला आहे.

शेतकऱ्यांची सोनालिकाला पहिली पसंती असल्याचे दाखवून दिले आहे. कोरोना संकटामुळे संपूर्ण शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना देखील शेतकऱ्यांना समृद्धी ट्रॅक्टरचे श्री.अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लकी ड्रॉ, शेतकरी सन्मान, ग्राहकांच्या घरी जाऊन सर्विसिंग सेवा, ट्रॅक्टर खरेदीच्या विविध योजना राबवून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात सोनालीका ट्रॅक्टर्स उपलब्ध करून दिले आहेत. समृद्धी ट्रॅक्टर्सच्या या यशातून अभिजीत पाटील यांनी हे दाखवून दिले की व्यवसायाच्या माध्यमातून सुयोग्य नियोजन करून शेतकरी बांधवांच्या अडचणीला उभे राहून त्यांची सेवा करू शकतो. या यशात शेतकरी बांधवांचा अनमोल वाटा आहे.

“कोरोनामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यांची ही अडचण लक्षात घेऊन जास्तीत जास्त सवलत देण्याचा प्रयत्न ह्या वर्षभरात आम्ही केला. शोरूमचे सर्व सेल्समन स्टापला शुभेच्छा. शेतकरी बांधवांनी खूप चांगला प्रतिसाद देत सोनालिका समृद्धी ट्रॅक्टरवर आपला विश्वास दाखवून दिला आहे. हा बहुमान माझा नसून शेतकऱ्यांचा आहे.

अभिजीत पाटील, (चेअरमन डीव्हीपी उद्योग समूह पंढरपूर)

Related posts