Blog

समाज दर्पण दिन–पत्रकार दिन :आरसा लोकशाहीचा

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव,
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापुर जिल्हा उस्मानाबद।
————————————-

आज 6 जानेवारी, मित्रानो आज पत्रकार दिन ,दर्पण म्हणजे आरसा आणि पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा असतो।आरसा कधीही खोटे बोलत नाही साहित्य,कला, पत्रकारिता,समाजाचा आरसा आहे राजकीय क्षेत्र असो,सामाजिक क्षेत्र, धार्मिक, शैक्षणिक,चळवळ असो की,ऐतिहासिक घटना असो त्याची संपूर्ण व सखोल माहिती खरीखुरी माहिती आपल्यासमोर मांडण्याचे कार्य हे पत्रकार करीत असतात

आधुनिक काळात वार्याच्या वेगाने माहिती समाजात पसरते सेकंदा सेकंदाला नवीन माहिती ती अपडेट बदललेली माहिती पुढे येते आणि ती आपल्याला आपल्या घरी आपल्या टीव्हीवर पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य पत्रकार करीत असतात मित्रांनो पत्रकार हा समाजाचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे कारण तो समाजातील सर्व घटकांची सत्यता, असत्यता आरशाप्रमाणे स्वच्छ आपल्यासमोर मांडतो पत्रकार प्रामाणिकपने त्याची पत्रकारिता प्रामाणिक, निस्वार्थी, त्यागी, कर्तव्यनिष्ठ, राष्ट्रप्रेमी, देश प्रेमी , तसेच देश हिताची मानव जातीची नव्हे तर जगातील निसर्गातील सत्यता व असत्यता जगासमोर आणण्याचे महान देश कार्य समाजकार्य हा घटक करीत असतो आज अशा या सन्माननीय घटकांचा सन्मान करण्याचा दिवस आज पत्रकार दिनानिमित्त सर्व सन्माननीय संपादक बंधू भगिनी, सन्माननीय पत्रकार बंधू भगिनी यांना मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा

पत्रकार हा सच्चा देश प्रेमी देश सेवक देशाची एकनिष्ठ तेणे सेवा करण्याचे व्रत घेतलेला असतो आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजासाठी आपल्यासाठी पर्यायाने देशासाठी करीत असलेली एक मोठी जागती देशसेवा आहे अगदी तुटपुंज्या मानधनावर किंवा पगारावर आपले कुटुंब परिवार सांभाळत हे कार्य अविरत चालू असते आपण सर्वांनीच अनुभवलेलं आहे पाहिलेल आहे कोरोणाच्या या भयंकर महा मारीत सुद्धा सतत आपली सेवा बजावण्याचे धाडसी कार्य कर्मयोद्धा पत्रकार बंधु करीत आहेत बऱ्याच माझ्या पत्रकार बंधूंना कोरोना सुद्धा झालेला आहे तरी सुद्धा न डगमगता न भिता न वेळ वाया जाऊ देता कुठल्याही वेळी कुठेही जाण्याची तयारी ठेवतात मग दुष्काळ असेल महामारी रोगराई असेल अतिवृष्टी असेल बर्फवृष्टी असेल महामारी असेल आग लागलेली घटना असेल किंवा एखादा अपघात असेल किंवा ऐतिहासिक काही प्रसंग असतील ते सर्व व्हिडिओच्या माध्यमातून ,संवादाच्या चर्चेच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचे कार्य किंवा आपापल्या घरी घर बसल्या टीव्हीवर पाठवण्याचे लाईव्ह दाखवण्याचे कार्य हे पत्रकार बंधू करीत असतात पत्रकारिता या क्षेत्रात कार्य करणाऱ्या बऱ्याच पत्रकारांना आज आदर्श पत्रकार म्हणून गौरविण्यात आलेले आहे ते त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल व सेवेबद्दल त्यांना मिळालेलं यश आहे आपण सर्वांनी अशा पत्रकार बंधूंचा वेळोवेळी गौरव केलाच पाहिजे हा एक स्तुत्य उपक्रम आहे

आधुनिक काळात तंत्रज्ञानाचा वापर कर्म योद्धा पत्रकार बंधू करीत असलेले आपण पाहत आहोतच जीवावर बेतणारे प्रसंग जीव मुठीत घेऊन प्रत्येक ठिकाणी पोहोचणारे पत्रकार म्हणजे एक निष्ठ देशभक्त होय भारत हा जगात सर्वात मोठी लोकशाही सर्वात समृद्ध लोकशाही असलेला देश आहे लोकशाहीची खरी तत्वता सिद्ध करण्यासाठी समान कायदे, समान न्याय , सर्व धर्म समभाव आपल्याला लोकशाहीने दिला आहे याच लोकशाहीत लिहिण्याचा अधिकार पत्रकारिता निखळपणे करण्याचा अधिकार भाषण स्वातंत्र्य अशा या विविध क्षेत्रामध्ये कार्य करण्याचा अधिकार दिलेला आहे याच अधिकाराच्या जोरावर आमचे पत्रकार बंधू म्हणजेच लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून जबाबदारीने कार्य करताना दिसत आहेत

आजच्या या पत्रकार दिनी पुनश्च एकदा सर्व सन्माननीय संपादक,महोदय सन्माननीय पत्रकार बंधूंना,भगिनिना मनःपूर्वक हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा ।

Related posts