उस्मानाबाद  तुळजापूर

श्रीमंत राजे—छत्रपती शिवाजी महाराज– एक दॄष्टिक्षेप ————————————-

आज 19 फेब्रुवारी श्रीमंत राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे जयंती दिनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनमोल कार्याlला उजाळा देण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न जयंतीनिमित्त, छत्रपती शिवरायांना कोटी कोटी विनम्र अभिवादन!तसेच सर्वप्रथम शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना, शिवप्रेमींना, शिवराया वर प्रेम करणाऱ्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ऐकताच अंगावर शहारे येतात गड, किल्ले, ढाल, तलवार, भाला, जंगल, पर्वत पठार, नद्या, घोडेस्वार, पायदळ सैनिक, गुहा तोफा, झेंडे मावळे त्यांचा गनिमी कावा व मावळ्यांच्या घोषणा हर हर महादेव!!

आकाश पाताळ दुमदुमून जाते आपल्या शरीरात एक प्रकारचा नवशक्ती चा संचार होतो आपल्या विचारांची शक्ती वाढते आपले रक्त उसळते आणि आपण त्याच प्रवाहात रमून जातो फक्त भारताच्या इतिहासातच नव्हे तर जगाच्या पटलावर शुन्यातुन इतिहास घडवणारा राजा जाणता राजा म्हणून आपल्या राज्यांची जगभर ओळख आहे मनाचे मोठे, विशाल अंतकरण, मनाचे श्रीमंत राजे म्हणून ज्यांची शत्रूलाही ओळख आहे असे राजे शूर, वीर, धाडसी शत्रूलाही घाम फुटावा हे नाव ऐकून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज होय महाराजांचा गनिमी कावा तर जगातील सर्वात गाजलेला प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगातून शत्रूच्या हातावर तुरी देऊन सुरक्षित बाहेर पडणे सुरक्षितपणे त्यांच्या जाळ्यातून निसटणे हे त्यांचे कौशल्य होते जास्तीत जास्त शत्रू सैन्यापुढे कमीत कमी आपले मावळे घेऊन लढाई करणे व शत्रूला हातघाईला आणणे सळो कि पळो करून सोडणे हे महाराजांच्या गनिमी काव्याचे प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. अंगावर रोमांच आणणार्‍या प्रसंगाने इतिहासाला सुद्धा अभिमान वाटावा बलाढ्य ,क्रूर लाखो सैनिक पाठीशी बाळगुन अंगावर आलेला अफजल खानाचा वध! आग्र्याच्या कडेकोट बंदोबस्तात तून सुखरूपपणे मिठाईच्या पेठार्‍यातून सुटका करून घेणे अंगाचा थरकाप उडवणारा प्रसंग आज आपण वेगवेगळ्या त्यांच्या पिक्चर, मालिकांमध्ये बघून रोमांचित होतो खऱ्या इतिहासातील खरा प्रसंग व खरा राजा म्हणून नावलौकिक असलेले महान छत्रपती म्हणजे शिवाजी राजे होय दिल्लीच्या लाल महालात शाहिस्तेखानाची फजिती बोटे तोडलेला प्रसंग जीवावरून बोटावर निभावलेला प्रसंग ,जीव वाचउन पळालेला शाहिस्तेखान हे प्रसंग आजही आपल्याला त्यांचा गनिमीकावा व सुरक्षिततेची प्रेरणा देतात जनतेवर अमानुष अत्याचार करणारी आदिलशाही, निजामशाही ,यांना मुठभर मावळे एकत्र करून झुंज देणारा कर्तृत्ववान जिद्दी व आपल्या मातोश्रीचा शब्द पाळणारे वचन पूर्ण करणारे राजे महाराजांच्या शूर वीर जिवलग मावळ्यांचे तर काय आणि कसे वर्णन करावे जीवाला जीव देणारे महाराजावर प्रेम करणारे ,राज्यावर प्रेम करणारे असे जिवलग मावळे त्यांचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात विचार शक्ती संपते शूर वीर तानाजी मालुसरे ,बाजीप्रभू देशपांडे, जिवा महाला ,शिवा काशिद, हंबीरराव मोहिते ,बाजी पासलकर ,येसाजी कंक, कोंडाजी फर्जद, संताजी घोरपडे, धनाजी जाधव , बहिर्जी नाईक, प्रतापराव गुजर, कान्होजी जेधे, नेताजी पालकर, मुरारबाजी असे कितीतरी जीवाला जीव देणारे मावळे समोर होते महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद प्राप्त असणारे, शक्ती प्राप्त असणारे, ज्यांनी महाराष्ट्राचि शून्यातून निर्मिती करणारे प्रभावी व्यक्तिमत्व उत्कृष्ट व्यवस्थापक मॅनेजमेंट गुरु म्हणून जगात प्रसिद्ध आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे मॅनेजमेंट हे सर्वात प्रभावी। व्यवस्थापक म्हणून आदर्श आहेत आदर्श राजा आदर्श मॅनेजमेंट आदर्श समाज सेवक आदर्श धर्मनिरपेक्ष राजा व राज्य आदर्श प्रजाहित दक्ष राजा खर्‍या लोकशाहीचा निर्माता म्हणून छत्रपती शिवरायांचे कार्य आजही नाव लौकिक आहे मनाचे श्रीमंत राजे जगात प्रसिद्ध असणारे राजे त्यांच्या जीवनातील कित्येक प्रसंग व उदाहरणे आजही आपल्याला प्रेरणा देतात बळ देतात आपली शक्ती वाढवतात त्यांच्यावर बालपणी झालेले आई जिजाऊंचे संस्कार लहानपणीच त्यांनी अनुभवलेला शत्रूंचा परकीय सत्तेची गुलाम शाही ,धार्मिक जातिभेद, आपापसातील मतभेद, आपापसातील लढाया महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे तसेच ती शुर वीरांची भूमी आहे महाराष्ट्राच्या मातीने आपल्याला हिमालया सारखा धाडसी, समुद्रासारखा विशाल मनाचा राजा दिला आहे स्वराज्याचा स्वराज्य दीप प्रज्वलीत करणारा राजा स्वातंत्र्याचा दीप प्रज्वलित करून भयंकर अशी सुलतानी निजामशाही ,आदिलशाही, मोगल ,फ्रेंच ,जर्मन इत्यादी धूर्त अशा सत्ताधाऱ्यांना धूळ चारीत परकीय आक्रमणांना तोंड देत त्यांचा मुकाबला करीत स्वराज्याची शपथ घेणारा व बालपणापासून स्वराज्य प्रेम देश प्रेम सुसंस्कृती जपणारा परकीय सत्ता जुलमी सत्ता आसमानी व सुलतानी संकटाच्या अशा वेळी राजमाता जिजाऊ ने शपथ घेऊन गोरगरीबावर होणारा अन्याय ,अत्याचार महिलावरील अत्याचार डोळसपणे बघून त्या शांत बसल्या नाहीत तर ही जुलमी सत्ता कशी उलथून पाडता येईल याचे डावपेच रचत होती आपल्या बाल शिवबाला पोटात असतानाच धाडसीपणा चे बाळकडू मिळाले होते घोडेस्वारी करणे ,दांडपट्टा चालवणे, शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवणे, गनिमीकावा या सगळ्या गोष्टी मासाहेबांनी कळत-नकळत शिवबाला शिकवल्या होत्या परकीय स्त्री मातेसमान मानली पाहिजे ही तर शिकवण महाराजांना बालपणीच मिळाली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावर इतका खोल परिणाम या धार्मिक संकटाचा झाला होता की लहानपणी त्यांचे सगळे खेळ किल्ल्याशी संबंधित घोडेस्वारी गनिमीकावा शत्रुंपासून सावध राहणे तलवारीशी खेळणे, चालवणे मुष्टियुद्ध ,दांडपट्टा, चालवणे जंगलातील वाटा शोधणे ,गुप्त मार्ग शोधणे, गावा गावा मधील रस्त्याचे अंतर नवीन रस्ते जुने रस्ते माहिती करून घेणे ,किल्ल्या किल्ल्या मधील आंतर या बाबी विशेष उल्लेखनीय आहेत समाजातील अत्याचार थांबविणे जनतेची होत असणारी लूट थांबवणे गुलामगिरीची वागणूक जनतेला मिळू नये देवालयाची सुरक्षितता ग्रंथालयाची सुरक्षितता माणसामाणसातील सुरक्षितता यासाठी ते प्रयत्नशील असत देशाला कर्तृत्ववान धैर्यवान शीलवान त्यागी संयमी प्रखर बुद्धिमत्ता स्वदेशाभिमान असलेली उगवत्या तरुणांची पिढी आवश्यक आहे आणि हीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे ती जपली पाहीजे जोपासली पाहिजे देशाबद्दल चांगल्या विचारांची खरी सत्य माहितीची शिदोरी त्यांना पुरविली पाहिजे माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार असतात याची सर्व जाणीव मासाहेबांनी महाराजांना बालपणीच दिली होती आपल्या मनातील प्रबळ हिंदवी स्वराज्याची इच्छा जिजाऊ ने शिवबाला दिली ती पूर्ण करण्यासाठी बालपणीच शिवरायांनी बाल मावळे जमा करून रायरेश्वराच्या मंदिरात आपली करंगळी कापून रक्ताचा अभिषेक केला व स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली जात धर्म वंश प्रांत यांचा विचार न करता एकत्र जोडलेल्या मावळ्यांना एकाच भगव्या झेंड्याखाली आपुलकीने प्रेमाने आणण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी केले या त्यांच्या कार्यामुळे शिवबा घराघरात पोहोचले स्वराज्यासाठी लागणारं सैन्य त्याने घराघरातून गोळा केले अनेक जाती धर्माचे लोक त्यांच्या सैन्यामध्ये होते आपणा सर्वांना माहितीच आहे जवळजवळ पाचशे पठाण सैनिक त्यांच्या छावणीत होते प्रत्येक जातीचा मावळा जीवाला जीव लावून लढत होता व स्वराज्यासाठी झटत होता.


इतिहासाला बदलण्याची ताकद ज्यांच्यामध्ये असते, घडविण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये असते असे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले बालपणीचे वचन शपथ पूर्ण केली व स्वराज्याची स्थापना केली व सर्व जनतेची होणारी लूट अन्याय अत्याचार थांबवला व जगामध्ये श्रीमंत राजे मनाचे श्रीमंत राजे म्हणून नावारूपाला आले अशा महान राजाला कोटी कोटी विनम्र अभिवादन!
जय हिंद l जय महाराष्ट्र l

लेखक
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव सहशिक्षक, श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,
तुळजापुर जिल्हा उस्मानाबाद।

Related posts