23.4 C
Solapur
September 10, 2024
उस्मानाबाद 

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांची आढावा बैठक आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक – मराठवाडा

उस्मानाबाद(धाराशिव) येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हयातील आरोग्य यंत्रणाची आढावा बैठक राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.ना. राजेशजी टोपे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

बैठकीच्या प्रारंभी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरेल असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मा.मंत्री महोदयांचा सत्कार करून उपस्थित स्थानिक लोकप्रतिनिधींनी आभार मानले.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मा.मंत्री महोदयांचा सत्कार करून उपस्थित स्थानिक लोकप्रतिनिधींनी आभार मानले.

आरोग्यमंत्री मा. राजेशजी टोपे यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव पाठवावे व कोरोनाच्या काळात ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात आले होते अशांना पुढील भरती प्रक्रियेत प्राधान्याने सामावून घेण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्या तसेच नव्याने मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

यावेळी स्वच्छता, पर्यावरण व पाणीपुरवठा राज्यमंत्री ना. संजयजी बनसोडे साहेब, खासदार ओमप्रकाश दादा राजेनिंबाळकर, आ. कैलासदादा पाटील, परिवहन महामंडळाचे मा.अध्यक्ष जीवनरावजी गोरे, नगराध्यक्ष मकरंद नंदूभैय्या राजेनिंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय मामा निंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले, जि.प.मुख्य अधिकारी डॉ.विजयकुमार फड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच. व्ही वडगावे, पोलीस उपविभागीय अधिकारी मोतीचंद राठोड तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related posts