कळंब

भाटशिरपुरा ग्लोबल फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सोयाबीन लागवड शेती शाळेस प्रतिसाद.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा.

कळंब – कळंब तालुक्यातील भाट शिरपुरा येथे कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत जागतिक बँक अर्थसहाय्यीत मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत शेतीशाळा घेण्यात आली.

कृषी विभाग आत्मा व भाटशिरपुरा ग्लोबल फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. भाटशिरपुरा यांच्या संयुक्त विद्यमाने सोयाबीन पीकाची शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती या शेती शाळेस प्रमुख मार्गदर्शक मा श्री बालाजी किरवले साहेब प्रकल्प उपसंचालक आत्मा उस्मानाबाद यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान बीज प्रक्रिया, बियाण्याची उगवण क्षमता कसे तपासनि, माती नमुने कसे काढावे, मूलद्रव्याचा वापर, एकात्मिक कीड व्यवस्थापन, रासायनिक खताचा वापर विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच श्री सावंत पी. व्ही. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा यांनी प्रस्ताविक व जागतिक बँक अर्थसहाय्य मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन या प्रकल्पाविषयी मार्गदर्शन केले. सदरील कंपनी चे सचिव अविनाश खापे पाटील यांनी स्मार्ट प्रकल्पातील पुढील वाटचाल येणाऱ्या काळात कंपनीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण योजनांची माहिती देण्यात आली आणि कंपनीचे अध्यक्ष श्री बलभीम सावंत यांनी जास्तीत जास्त सभासद जोडण्यासाठी प्रयत्न करावा असे उपस्थितांना सांगितले. या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे तसेच बीज प्रक्रिया किट वाटप करण्यात आले.

यावेळी संचालक गोपाळ रितापुरे, रमेश रितापुरे कंपनी चे शेतकरी सभासद उपस्थित होते.

Related posts