पंढरपूर

ट्राफिक पोलिसांची कारवाई शथिल करा. – स्वाभिमानी शेतकरी शेतकरी संघटनेची मागणी

पंढरपूर /शहर प्रतिनिधी
कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून करण्यात आलेल्या लाँकडाऊमुळे अर्थिक आडचणीत सापडलेला सामान्य नागरिकांवर ट्रॅफिक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. कारवाईच्या नावाखाली सामान्य नागरिकांकडून ५०० पासुन ५००० पर्यंतचे दंड आकारला जात आहे.यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले जात आहे. दिवाळीच्या सणामुळे ग्रामीण भागातुन खरेदी साठी मोठ्या प्रमाणावर लोक शहरात येत आहेत. अर्थिक चणचणीमुळे काटकसरीने दिवाळी साजरी करणारे शेतकरी,कष्टकरी,मजुरी करणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर मोटारसायकल वर शहरात येऊन बाजार करत आहेत. त्यांच्या खिशाला ट्राफीकच्या धडक कारवाई मुळे झळ पोचत आहे.

या सर्व आडचणी लक्षात घेता ट्राफिकची कारवाई शिथिल करण्याची विनंतीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर उप विभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांना करण्यात आली. यावेळी तानाजी बागल ,शहाजहान शेख,सचिन पाटील,रणजित बागल, आबा शिंदे, अतुल गायकवाड आदी उपस्थित होते.

Related posts