पंढरपूर

विठ्ठलवाडी, भटुंबरे, विसावा येथील पुनर्वसित रहिवाशांना तात्काळ ( स्मशानभुमी) प्रश्न मार्गी लावावा.

बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक.

पंढरपूर / प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठलवाडी,भटुंबरे, विसावा येथील पुनर्वसित रहिवाशांचा  स्मशानभूमीच्या जागेवरून अडवणूक असल्याबाबत बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या ४० वर्षांपासून उजनी धरणा मध्ये आपली घरे जमिनी पाण्याखाली जाऊन सुद्धा महाराष्ट्र शासनाने पुनर्वसन केलेल्या पंढरपूर तालुक्यातील विठ्ठलवाडी, विसावा येथील १००० लोकवस्ती असलेल्या व उजनी पुनर्वसन विभागाने मंजूर केलेल्या स्मशानभूमीच्या जमिनीच्या लगतच एका कारखान्याच्या एमडी व शेती अधिकारी यांनी गृह प्रकल्प उभा करण्यासाठी जागा घेतलेली आहे. सदर जागा येणे केलेले आहे. या नियोजित प्रकल्पाच्या जवळच महाराष्ट्र शासनाने पुनर्वसन ग्रामस्थांसाठी गट नंबर ५८/२ /ब एवढे क्षेत्र स्मशानभूमीसाठी  राखीव ठेवलेले आहे. सदर काम उजनी कालवा विभाग क्रमांक-८ सोलापूर या विभागाने स्मशानभूमि साठी सुमारे दहा लाख रुपये मंजूर केले असून सदर कामाचे टेंडर ही झालेले आहे. परंतु लोकप्रतिनिधींच्या राजकीय दबावापोटी याठिकाणी स्मशानभूमी चे काम करू दिले जात नाही. सदर जागा काही दलाल मंडळी दुसरे धरणग्रस्त टाकून लाटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

 

बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने व विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्यावतीने निवेदन देण्यात आले.असून तात्काळ स्मशानभूमी चे काम सुरू करून स्मशानभुमी  पोलीस बंदोबस्तात ऊभी  करावी. अन्यथा दुर्दैवानं या गावांमध्ये एखादा रहिवाशी मयत झाल्यास अंत्यविधीला जागा नसल्यामुळे पंढरपूर तहसील कार्यालयासमोर सदर अंत्यविधी केला जाईल.असे निवेदनात म्हटले आहे.तसेच या प्रकारणाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील या निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी, पंढरपूर तहसीलदार, पंढरपूर पोलीस निरीक्षक, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन यांना देण्यात आले.

यावेळी बळीराजा संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर,जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर, सचिन शिंदे श्रीकांत नलवडे, ज्ञानेश्वर गुंडगे, दादासाहेब खांडेकर ,पंकज देवकते ,औदुंबर सुतार, नितीन गावडे, शेखर कोरके ,सर्जेराव शेळके यांचे सह संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts