उस्मानाबाद 

पंचायती राज समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल आ. कैलास घाडगे-पाटील यांचा तुळजापूर शिवसेनेच्या वतीने सत्कार

साईनाथ जगन्नाथ गवळी
तुळजापूर/धाराशिव (उस्मानाबाद)
प्रतिनिधी.

काल धाराशिव (उस्मानाबाद) येथील शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयात पंचायती राज समितीच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल कळंब-धारशिवचे विद्यमान शिवसेना आमदार तथा धारशिवचे शिवसेना जिल्हाप्रमुख मा. कैलासदादा घाडगे-पाटील यांचा तुळजापूर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कळंब-धारशिवचे विद्यमान शिवसेना आमदार तथा धारशिवचे शिवसेना जिल्हाप्रमुख मा. कैलास घाडगे-पाटील यांची नुकतीच पंचायती राज सदस्य (PRC) पदी नियुक्ती झाली आहे. यामुळे धाराशिव शिवसेनेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे धाराशिव शिवसेनेत आणखी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मा. आ. कैलासदादा पाटील यांच्या झालेल्या नियुक्ती बद्दल त्यांचा काल धाराशिव(उस्मानाबाद) येथील शिवसेना संपर्क कार्यालयात तुळजापूर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी तुळजापूर चे शिवसेना तालुकाप्रमुख मा. जगन्नाथ (दाजी) गवळी, धारशिवचे तालुकाप्रमुख मा. सतिशकुमार (शेठजी) सोमाणी, अपसिंगा ग्रा.पं. सदस्य – अमिरभाई शेख, बालाजी पांचाळ, निवृत्ती देवगिरे कार्यालयप्रमुख नितीन भांगे यांच्यासह अनेक शिवसैनिक बांधव उपस्थित होते.

Related posts