कविता 

खरंच…, “करुणा” मला लय शीकवून गेला…!

ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार
मु पो बामणी ता जि धाराशिव-४१३५०६
===================================

आमच्या आयुशात अचानक
पावण्यासारका आला
पाणभरतीच्या भावाला
आयता वाटेकरी जणू पाठवूनच दिला
खरंच करुणा मला लय शीकवून गेला !

बातम्या लिवणारं आन टीवी दावणार जणू
वकिली कराया देवदूतच झाले
८ महिने घरात बसून फकस्त
रामायण ,महाभारत,आन त्या कंगना बयाचे बोलबाले
शेतकऱ्याची आयती भाकर खाऊन त्यासनी साले पण मनुन निघाले
खरंच करुणा मला लय शीकवून गेला !

मधीच गंजाडी कोंतर
वरलाकड फास घेऊन मेलाय म्हणं
त्याच्याच काळजीनं मालकाच येड झालंय मन
दुबार पेरून पण त्या इपितर पावसानं
नीट कुठला खाऊ दिलाय सण ?
कुणीतर दावायचा व्हता पावसातला माझ्या
मायबापाच्या सपनाचा वाहता क्षण
खरंच करुणा मला लय शीकवून गेला !

अजून मदत कराया पाठराखणीची
आला व्हता मन मुखमंतरी
पण ह्या वजाबेरिजि तुन
कुठली मदत उतरलं अंतरी
खरंच करुणा मला लय शीकवून गेला !

गावात,चौकात,येशिवर जरी
लोक जास्त दिसत व्हती
तशीच भाकरीला मवताज झालेली
बिनदिव्याची झोपडी तुमास्नी दिसणारच नव्हती
खरंच करुणा मला लय शीकवून गेला !

आबा बोलला “आमदार लोक आमच्यासाठी
इधिमंडळात भांडत बसत्याती” व्हय
म्या म्हणलो मग
“आम्हांसनी येड्याला काय कळतंय आपल्याला मातर
चुलीपतूरचा आवाज आन उद्याच्या भाकरीचच भय”
खरंच करुणा मला लय शीकवून गेला !

त्यो बच्चन बी नीट व्होउन घरी आलाय म्हण
पर मग ईठुरायच्या दर्शनाला गावागावातून फुकटात लोकांना नेणारा माझा भालके नाना कसा गेला ?
खरंच करुणा मला लय शीकवून गेला !

टीप – गावठी भाषेत आणि कोणत्याही राजकीय लोकांना संबोधून नाहीय ,कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व

Related posts