उस्मानाबाद  तुळजापूर

शंभू सेनेच्या तुळजापूर तालुकाध्यक्ष पदी पुरुषोत्तम बेले तर उस्मानाबाद तालुकाध्यक्ष पदी विजयकुमार कोळगे यांची नियुक्ती.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

परंडा – शंभूसेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपूर्ण राज्य भर राष्ट्रहितकार्य करण्याकरता युवक संघटन मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. शंभू सेना महाराष्ट्र राज्य सेनाप्रमुख अतुल माने-पाटील, प्रदेशाध्यक्ष किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष रणजीत पाटील यांनी तुळजापूर तालुकाध्यक्ष पदी पुरुषोत्तम बेले तर उस्मानाबाद तालुकाध्यक्ष पदी विजयकुमार कोळगे यांची नियुक्ती करण्यात आली. शंभू सेना संघटना महाराष्ट्र राज्यात सामाजिक तसेच जनहितासारख्या वस्तू मोफत वाटप सेवा करत आली आहे.

तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा गावचे सुपुत्र पुरूषोत्तम विष्णु बेले यांची शंभू सेना संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. तुळजापूर तालुक्यातील पुरूषोत्तम विष्णु बेले हे गेली अनेक वर्षे नेहरू युवा केंद्र (भारत सरकार) ,आरंभ बहुउदेदशीय सामाजिक संस्था नळदुर्ग, विवेकानंद युवा मंडळ चिकुंद्रा, आदि संस्था च्या माध्यमातून गरीब गरजू कुटुंबांना रेशन कीट वाटप, कोरोनाच्या महामारीत आरोग्य सेवा कर्मचार्यांना मास्क ,सॅनिटाइजर, हँन्डग्लोव्ज, आदि सांरख्या वस्तू वाटप केल्या असून, आरोग्य शिबीर च्या माध्यमातून गरीब नेत्र तपासणी, कान तपासणी, मोफत शस्त्रक्रिया, गोपीनाथराव मुंडे अपघाती विमा योजनेचा लाभ, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ, मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ अशा नानाविध प्रकारच्या योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. युवकांसाठी क्रीडा स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, युवा नेतृत्व विकास शिबीर च्या माध्यमातून स्कील डेव्हलपमेंट रोजगार निर्मिती करून दिली. त्याचबरोबर ग्रामस्वच्छता अभियान, कोरोणा काळात जनजागृती काम कोव्हीड वॉरियर्स म्हणून केले, तसेच पोलीस मित्र म्हणून पोलीस बांधवांना सहकार्य करत असतात त्यांच्या या कार्याची दखल शंभू सेना संस्थापक अध्यक्ष अतुल नाना माने पाटील, जिल्हा अध्यक्ष रंजीत पाटील यांनी पाटील यांनी घेत त्यांची तुळजापूर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीचे सर्वच स्तरातून कौतुक केले होते आहे. निवडीबद्दल तालुका अध्यक्ष पुरूषोत्तम बेले यांनी आभार मानले असून पुढील कार्य समर्थपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

समाजकार्यातील तळमळ पाहून या नियुक्त्या केल्या आहेत असे जिल्हाध्यक्ष रणजीत पाटील यांनी सांगितले.या प्रसंगी समाधान डाके,प्रदीप साठे,रोहन गाढवे,विजय पाखरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts