महत्वाच्या बातम्या

पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा रद्द झाल्याची

बातमी सोलापूर जिल्ह्यातील दुथडी भरून वाहणाऱ्या भीमा नदीची

उजनी धरण क्षेत्र आणि वीर धरण क्षेत्र या परिसरात पावसाचा जोर वाढल्याने दुपारी चार वाजल्यापासून वीर धरणातून 13911 क्यूसेक्सचा तर उजनी धरणातून भीमा नदीत पन्नास हजार क्युसेक विसर्ग सोडला जातोय , त्यामुळे नरसिंगपूर येथे भीमा नदीत 39 हजार क्यूसेक्स चा विसर्ग वाहत असल्याने भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे भीमा आणि नीरा पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढत असल्याने नदीची पाण्याची पातळी वाढण्याची भीती व्यक्त होतेय त्यामुळे जलसंपदा विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे

बातमी अक्कलकोट परिसराला पाऊसने झोडपल्याची

सोलापूर जिल्ह्यात जिल्हाभर पावसाचा हाहाकार उडाला आहे या पावसाचा फटका अक्कलकोटच्या राजघराण्याच्या राजवाड्याला सुद्धा बसला आहे अक्कलकोट संस्थानाच्या जुना राजवाडा 273 वर्षाचा जुना आहे या राजवाडा ची दुर्बिन बुरूज ढासळला आहे हा राजवाडा छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांनी बांधला होता त्यांचे मानसपुत्र असलेले श्रीमंत फत्तेसिंह भोसले यांनी या राजवाड्यात अक्कलकोट संस्थान स्थापन केले राजवाड्याची काळजी न घेतल्याने हा जुना ऐतिहासिक ठेवा दुरावस्थेकडे चालला आहे, तर अक्कलकोटच्या दुसरीकडे ालुक्‍यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला अनेक पिके जमीनदोस्त झाली आहेत पाऊस सोयाबीन विविध फळबागा या पावसाच्या पाण्यात अडकले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होतंय , या नुकसानग्रस्त भागाला आमदार संचिन कल्याण शेट्टी यांनी ताबडतोब ग्रुप भेट घेऊन नु नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली,शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे मोठे नुकसान झालाय, झालेले नुकसानचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत,नुकसानग्रस्त भागाला भेट दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय

आता बातमी पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा रद्द झाल्याची

पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा तांत्रिक कारणामुळे आज रद्द करण्यात आल्या होत्या सोलापूर जिल्ह्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे या परीक्षा रद्द करण्यात आल्या 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी च्या रद्द झालेल्या ऑनलाइन परीक्षा आता पुढे ढकलण्यात आले आहेत, या परीक्षा आता अनुक्रमे 19 20ऑक्टोबर रोजी होणार आहेत ,मात्र ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा पूर्ण केल्या असतील त्यांनी पुन्हा परीक्षा देण्याची गरज नसल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे,ज्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा अर्धवट राहिले असतील त्यांनी पुन्हा परीक्षा देणे गरजेचे असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात एलआयसी त्या विद्यार्थ्यांना आता 19 आणि 20 ऑक्टोबर अशी वाट पाहावी लागणार आहे

– बातमी आता उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात पावसाने केलेल्या नुकसानीची

परतीच्या पावसामुळे तुळजापूर तालुक्यातल्या अनेक गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले गावातील नागरिकांच्या घराच्या अतोनात नुकसान झाले आहे, तालुक्यातील सर्व ओढे-नाले तलाव तुडुंब भरल्याने अनेक गावांना जोडणारे वाहतुकीचे रस्ते बंद झालेत,त्यामुळे बहुतांश गावातील जनजीवन विस्कळीत झालंय ,तालुक्यातील अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनचे पीक शेतात असलेल्या पाण्यामुळे वाया गेल्याने शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात संकटांना सामना द्यावा लागतोय प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांमध्ये जोर धरते आहे

आता बातमी बार्शी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी , पाच गावाचा संपर्क तुटला

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जवळगाव मध्यम दुधडी भरून वाहू लागला आहे नागझरी नदीला पूर आलाय पाच गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे त्यामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे आंबेगाव हत्ती अंबाबाई वाडी ज्योतीबाची वाडी या पाच गावांचा संपर्क तुटला आहे पाटबंधारे विभागाने धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे शेतात पाणी शिरून पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तरीही गावकऱ्यांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे ,मुसळधार पावसामुळे संपर्क तुटलेल्या गावातील नागरिक तालुक्याच्या संपर्कात येण्यासाठी धडपड करत आहेत

Related posts