अक्कलकोट

‘आहार हेच औषध’ पुस्तकाचे कै.इंगळे महाविद्यालयात प्रकाशन.

अक्कलकोट( प्रतिनिधी ) –

येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात ‘आहार हेच औषध’ या पुस्तकाचे प्रकाशन  मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते करण्याचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर येथील ‘आहार हेच औषध’ पुस्तकाचे लेखक तथा प्रसिध्द निसर्गोपचार व स्त्रीरोग तज्ञ डॉ.सोनाली घोंगडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे शुभारंभ येथील कै. कल्याणराव इंगळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून दिपप्रज्वलनाने अभिवादन करून करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. सोनाली घोंगडे यांनी श्री स्वामी समर्थांच्या आशिर्वादाने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने अक्कलकोटसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्र निकेतन महाविद्यालयाच्या माध्यमातून तांत्रिक शिक्षण पध्दती उपलब्ध करून दिल्याने या परिसरातील तंत्र शिक्षण घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची महत्वाची सोय झाली असल्याचे सांगीतले. आज विद्यार्थ्यांना आयुष्याची दिशा ठरविणारे महत्वाचे असे तंत्रशिक्षण घेत असताना आभ्यासाच्या ताणतणावामुळे विद्यार्थ्यांचे स्वतच्या दिनचर्येकडे व आहाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे, याकरिता आपण देशाच्या या भावी पिढीकरिता ‘आहार हेच औषध’ हे पुस्तक स्व:ता लिहून येथे प्रकाशीत केले असल्याचे सांगून त्यातील टिप्सचा विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अवलंब केल्यास विद्यार्थ्यांचे भविष्यकालीन जीवन हे निश्चीतच आनंदमयी व सुदृढ आरोग्याने परिपूर्ण असेल या करीता आज या पुस्तकाचे समर्थ नगरीत प्रकाशन करून या सह भविष्यात ते विविध महाविद्यालयातही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाईल असे प्रतिपादन केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे सर, उपप्राचार्य विजय पवार सर, हरिष घोंगडे सर,  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक घुरघुरे सर यांनी केले तर आभार प्रा.जेऊरे सर यांनी मानले.

Related posts