उस्मानाबाद 

ढोकी येथील युवकांचा बहुजन विकास मोर्चात जाहीर प्रवेश.

जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

आज श्रावस्ती बौद्ध विहार जय भवानी नगर ढोकी ता जि उ.बाद येथे शेकडो कार्यकर्त्यांनी बहुजन विकास मोर्चा मध्ये जाहीर प्रवेश केला व कार्यक्रमास उपस्थित बहुजन विकास मोर्चा कळंब तालुकाअध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे यांचा सत्कार करून “तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीं चे व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन सर्व भीमसैनिकांनी जिल्हाध्यक्ष राहुल हौसलमल यांचा सत्कार केला..

तसेच गाव तेथे बौद्ध विहार पुस्तक भेट देऊन बौद्ध विहार व्यवस्थापन कमिटी यांच्या कडून सत्कार करण्यात आला. बहुजन विकास मोर्चा शाखा ढोकी स्थापन करण्यासाठी चर्चा केली व सामाजिक चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमास उपस्थित माजी उपसरपंच आपा कांबळे जिवन ढवारे निखिल जाधव मोहन ढवारे सौरभ होळकर अक्षय आवटे आक्षय ससाणे सुमित वाघमारे दिनेश कांबळे नितीन जाधव महादेव मांदळे इ उपस्थित होते.

Related posts