पंढरपूर

स्वेरी अभियांत्रिकीचे प्रा. प्रवीण ढवळे यांना पीएच.डी. प्राप्त.

सचिन झाडे

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. प्रवीण अर्जुन ढवळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर कडून अभियांत्रिकीमधील ‘ऑप्टीमायझेशन ऑफ रेजिस्टन्स स्पॉट वेल्डिंग फॉर मल्टिपल स्पॉट्स वुईथ रिस्पेक्ट टू वेल्ड स्ट्रेंथ’ या विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांना स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.

मुळचे सापटणे (ता.माढा) येथील रहिवाशी असलेले प्रा. प्रवीण ढवळे यांना पीएच.डी.चा अभ्यास करताना आई, वडील, भावंडे, पत्नी सौ. दिपा ढवळे यांच्यासह स्वेरी अभियांत्रिकीचे प्रशासन अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.संदीप वांगीकर, डॉ. सचिन सोनवणे, डॉ. रणजित गिड्डे यांच्यासह स्वेरीचे इतर प्राध्यापक व सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. ढवळे हे स्वेरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात उत्कृष्टपणे ज्ञानदान करत आहेत. त्याचबरोबर हैद्राबाद मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांनी रिसर्च पेपर सादर केले होते तसेच त्यांनी एकूण सहा संशोधनपर लेख नामवंत जर्नल्स मधून प्रकाशित केले आहेत. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी संशोधनपर लेख सादर केलेले आहेत. मटेरियल सायन्स व ए.आय.पी कॉन्फरन्स अशा दोन आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. पीएच.डी. प्राप्त केल्याबद्धल डॉ. प्रवीण ढवळे यांचा स्वेरीमध्ये सत्कार करण्यात आला.

तसेच स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी डॉ. ढवळे यांचे अभिनंदन केले.

Related posts