पंढरपूर

स्वेरी अभियांत्रिकीच्या प्रा.माणिक देशमुख यांना पी.एच.डी. प्राप्त.

पंढरपूर-

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’च्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील प्रा. माणिक गुंडेराव देशमुख यांना सेव्होरे (भोपाळ, मध्य प्रदेश) मधील श्री सत्यसाई युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड मेडिकल सायन्सेसमधून ‘एक्स्प्लोरिंग हिस्टॉरिकल मेसनरी स्ट्रक्चरल बिएव्हीअर युजिंग मॉडर्न फायनाईट एलिमेंट बेस्ड मेथड’ या विषयामधून पी.एच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांना भोपाळ विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अजय स्वरूप यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.

प्रा. माणिक देशमुख यांना पी.एचडी.चा अभ्यास करताना पत्नी सौ. धैर्यलक्ष्मी व भावंडे यांच्यासह स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांच्यासह स्वेरीचे इतर प्राध्यापक व सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. ‘डॉ. माणिक देशमुख हे स्वेरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हील इंजिनिअरिंग विभागात गेल्या तीन वर्षापासून उत्कृष्टपणे ज्ञानदान करत आहेत. त्याचबरोबर मुंबईमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांनी रिसर्च पेपर्स सादर केले आहेत. तसेच त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून १२ रिसर्च पेपर्स देखील प्रकाशित झाले आहेत. पी.एच.डी. प्राप्त केल्याबद्धल संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा. सी. बी. नाडगौडा यांच्या हस्ते डॉ. माणिक देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. माणिक देशमुख म्हणाले की, ‘ मला मिळालेल्या या यशाचे प्रथम श्रेय मी स्वेरीला देतो. स्वेरी मध्ये उच्च शिक्षणासाठी दिले जाणारे प्रोत्साहन व सर्वांचे सहकार्य यामुळे मला हे यश प्राप्त झाले.’

पीएचडी प्राप्त केल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मनियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे यांच्यासह, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी डॉ. माणिक देशमुख यांचे अभिनंदन केले.

Related posts