उस्मानाबाद  तुळजापूर

बिनविरोधचा “भाजपा” आव आणतय ; सतीशकुमार सोमाणी यांचा पलटवार !

उस्मानाबाद दि.२२ (प्रतिनिधी) –

सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सरपंचपदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आलेले आहे. तालुक्‍यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या असून काही ग्रामपंचायतीमध्ये तर भाजपला उमेदवार देखील उभा करता आलेला नाही. अशी विदारक व दयनीय परिस्थिती असताना देखील भाजपचे तथाकथित आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद तालुक्यातील ४१ ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असल्याची धांदात खोटी आव आणून आपले हास्य करून घेतले असल्याचा जबरदस्त पलटवार उस्मानाबाद शिवसेना तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांनी केला आहे.

पुढे बोलताना उस्मानाबाद शिवसेना तालुकाप्रमुख सोमाणी म्हणाले की, उस्मानाबाद तालुक्यातील डकवाडी, टाकळी (ढोकी), धुत्ता व पोहनेर या चार ग्रामपंचायतीसाठी निवडणूक न होता त्या गावच्या सर्वपक्षीय मंडळींनी सर्व सदस्यांना बिनविरोध निवडून दिलेले आहे. तर बेगडा वरवंटी यासह अनेक गावांमध्ये भाजपला साधा उमेदवार देखील मिळालेला नाही. त्यावरूनच भाजपची व त्यांच्या मंडळींची अत्यंत केविलवाणी अवस्था झाल्याची वास्तवादी व सत्य परिस्थिती असताना पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरोबा केलेले व सध्या भाजपात तळ्यात-मळ्यात अशा भुमिकेत

वावरत असलेले तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद तालुक्यातील एक दोन नव्हे तर चक्क ४१ ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात असल्याचा अत्यंत खोटा, चुकीचा व दिशाहीन पद्धतीने केलेला हा दावा म्हणजे बौद्धिक व वैचारिक दिवाळखोरी असल्याचा टोलाही सोमानी यांनी लगावला आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ते जिल्ह्यामध्ये विशेषत: या निवडणूक प्रक्रियेत सक्रिय नव्हते. विशेष म्हणजे या या निवडणुकीमध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे या ग्रामपंचायतवर प्राबल्य असून महाविकास आघाडीच्या ताब्यात बहुसंख्य ग्रामपंचायती असल्याचा ठाम दावा देखील त्यांनी केला आहे.

Related posts