तुळजापूर निधन वार्ता

प्रमोद (पिंटू) पाटील यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन.

प्रतिक शेषेराव भोसले
गंधोरा, (प्रतिनिधी)

तुळजापूर तालुक्यातील गंधोरा गावचे सुपुत्र शांत, संयमी आणि मनमिळाऊ स्वभाव अशी ओळख प्रस्थापित केलेले प्रमोद नागनाथ पाटील वय ४१ वर्षे यांचे रविवारी २१ मार्च रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

मनमिळाऊ आणि शांत स्वभावामुळे ते पंचक्रोशीत ओळखले जात होते, मुळचे गंधोरा गावचे पण व्यवसायासाठी पुण्याला स्थायिक झालेले प्रमोद पाटील
यांच्या निधनाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिवसभर त्यांची तब्येत ठीक होती, पण अचानक त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे ते चक्कर येऊन कोसळल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान संध्याकाळी ७:३० साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सामाजिक उपक्रमात सढळ हाताने मदत करणाऱ्या पाटलांचा सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याकडे कायम कल होता, कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व, मनमिळाऊ आणि मृदूभाषी म्हणून त्यांची ओळख कायम सगळीकडे होते. त्यांच्या निधनाने गंधोरा ग्रामस्थांसह, सलगरा परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे, त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी गंधोरा दि.२२ रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. शांत, संयमी आणि मनमिळाऊ स्वभाव या मुळे ते पंचक्रोशीत ओळखले जात असल्याने, त्यांच्या अशा अकाली जाण्याचा पंचक्रोशिला धक्का बसला आहे.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गंधोरा गावावर शोककळा पसरल्याने, तालुका स्तराबरोबरच जिल्हा स्तरावर देखिल संबंधितांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्यांच्या मागे आई, वडिल, पत्नी एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, असा परिवार आहे

Related posts