Blog

कोरोणा काळात करा कलेची साधना —

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवास राव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर ,जिल्हा उस्मानाबाद।

========================================================================================================

कला ही माणसाच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे माणसाच्या जीवनाला उजाळा देते ती कला, माणसाला सूर्यप्रकाशा प्रमाणे तेजोमय प्रकाशमय करते ती कला, माणसाला उत्साह प्रेरणा देते व एक सुंदर तेजोमय वलय स्वतःभोवती निर्माण करते ती कला !समाजात मानसन्मान, प्रतिष्ठा प्राप्त होते ते कले मुळेच. आपण आपले कर्तव्य तर करतोच पण कर्तव्य करीत असताना, सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपल्याला आवडणारी, मूलतः आपल्याला सहज जमेल अशी कोणतीही कला आपण जोपासू शकतो .

कला हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे मानवी जीवनातून कला जर वजा केली तर आपले जीवन जवळ जवळ शून्य असे राहते कोरोणा काळातील लॉक डाऊन मुळे आपल्या दिनचर्येत खूप बदल झाला आहे, दिनचर्या पूर्ण विस्कळीत झालेली आहे तरी विद्यार्थी व नव तरुणांनी या बंदच्या काळात वेगवेगळ्या कलेचा अभ्यास करावा कलेची साधना करावी व आपल्या जवळ असलेल्या सुप्त कलागुणांना वाव द्यावा व त्याचा सदुपयोग करून घ्यावा वेळेचा सदुपयोग करून संधीचा फायदा करून घ्यावा कोणीतरी म्हटलेलेच आहे,” संधी हा उडता पक्षी आहे दिसताक्षणीच त्याची शिकार करा “कोरोनाच्या काळजीने सर्वजण चिंताग्रस्त आहेत, बाहेर सर्वत्र बंद असल्यामुळे फिरणे, खेळणे, मैदानावर पळणे, व्यायाम, योगा सर्व बंद झालेले आहे .

फिरणे मॉर्निंग वॉक सर्वकाही बंद झालेले आहे त्यामुळे पुन्हा आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते! त्यापासून दूर राहण्यासाठी आरोग्य निरोगी, सुदृढ व सुरक्षित राहण्यासाठी आपले मनही निरोगी असणे गरजेचे आहे” मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण “जर आपले मन प्रसन्न असेल, आनंदी असेल, तर आपले आरोग्यही निरोगी राहते त्यासाठी कला व मनोरंजन करणे आवश्यक आहे. दररोजच्या कामातून वेळ काढून आपण विविध प्रकारच्या कलेचा अभ्यास करू शकतो उदाहरणार्थ चित्रकला, हस्त कला ,कार्यानुभव, शिल्पकला,वास्तुकला, मूर्तिकला, संगीत कला यामध्ये हार्मोनियम वादन, तबला वादन, गायन करणे तसेच विविध प्रकारची रांगोळी काढणे, माती काम करणे त्यात विविध किल्ले, पर्वत, मंदिर, बाग-बगीचा तयार करणे .भाषण कलेचा, वक्तृत्व कलेचा अभ्यास करणे, शिवणकला, ड्रेस डिझायनिंग, लेखन कौशल्य विकसित करणे, लेख कविता ,काही सामाजिक कार्यात भाग घेणे इत्यादी-इत्यादी यातले काहीच नको असेल तर आपल्या घराचे अंगण सुशोभित करणे वृक्षारोपण करणे विविध फुलांची फळांची छोटी छोटी झाडे आपण लावू शकतो व त्यांना दररोज पाणी घालून त्यांचा सांभाळ करू शकतो !कारण वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज आहे

प्रत्येकाने आपल्या अंगणात तुळशीची झाडे लावावीत तुळस ही आपणा सर्वांची माता आहे व आपले आरोग्य निरोगी सुदृढ ठेवण्यास खूप मदत करते आपले घर पवित्र व मंगलमय ठेवते भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे मुलींसाठी सुद्धा घरीच राहून छोट्या छोट्या कला जोपासता येईल रांगोळी काढणे, विविध प्रकारचे चित्र, डिझाईन तयार करणे ,भिंतीवरील वेगवेगळ्या प्रकारचे वॉलपेपर तयार करणे, विविध प्रकारची कलरफुल रांगोळी, शिवणकला, ड्रेस डिझायनिंग तसेच मेहंदी काढणे मेहंदी च्या वेगवेगळ्या डिझाइन्स शिकणे काढणे सराव करणे त्याबरोबरच आपल्याला याच कलेचा उपयोग हा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा करता येईल मोबाईल, लॅपटॉप, टॅब इत्यादि माध्यमाच्या आधारे ही कलेचा जास्तीत जास्त विकास करता येईल .तंत्रज्ञानातील विविध छोटे-छोटे कोर्सही करता येतील त्याचबरोबर लहानांसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, हस्ताक्षर लेखनाचा सराव ,अक्षरे वळणदार काढणे, सुंदर सुंदर बोलक्या चित्रांच्या माध्यमातून लेखन करणे त्याचबरोबर टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू तयार करणे हा उपक्रम खूप आनंददायी व उत्साहवर्धक व कमीत कमी खर्चिक आहे उदाहरणात घरातील काडी पेटी पासून वस्तू तयार करणे, काडी पेटी मधील काड्या पासून विविध वस्तू बनवणे ,शर्टच्या बटना पासून वेगवेगळ्या कलाकृती निर्माण करणे, वेली फुले पाने तसेच पुठ्ठ्यापासून, कागदा पासून वहिच्या पुठ्या पासून भिंतीवरील वॉलपेपर तांदळा पासून, विविध डाळी पासून, तसेच जुन्या कपड्या पासून ही वेगवेगळ्या वस्तू आपल्याला बनवता येतात.

विज्ञान क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवनवीन विज्ञानातील प्रयोग नवोपक्रम करावेत. चौसष्ट कलांचा अधिपती श्रीगणेशा आपल्याला या कलेमध्ये काम करण्यासाठी शक्ती व प्रेरणा देतो कोणत्याही कलेची सुरुवात ही अगदी मनापासून करा मन ओतून काम करा त्यात यश हे मिळतेच कला ही माणसाला सुंदर बनवते माणसाचे मन देखील कलेने सुंदर बनते सकारात्मक ऊर्जेने ओतप्रोत होते त्या कलेची उपासना सतत केली पाहिजे साधना केली पाहिजे तरच ती आपल्याला साध्य होते आजच्या या संवेदनशील काळात परिस्थितीत आपले मन आत्मबल ,मनोबल व आपली मानसिकता चांगली व उत्तम ठेवण्यासाठी आपल्याजवळील सुप्त कलेची साधना करा तरच आपले जगणे आनंदी व सुखकारक होईल. या विविध कलेतून आपल्याला जीवनाचा मार्ग शोधता येतो आपल्या जीवनाचा अथांग सागर कलेमुळे सहजतेने पार करता येतो व आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येते कुठल्याही कार्याची सुरुवात हे अर्धे कार्य पूर्ण झाल्या सारखे असते! म्हणून विशेषतः विद्यार्थ्यांनी न व तरुणांनी या संधीचा फायदा करून घ्यावा व आपल्या सुप्त कलागुणांना वाव द्यावा कलेतून जीवनाचा शोध घेता येतो जीवनाचा अथांग सागर कलेमुळे सहजतेने पार करता येतो यातलं आपल्याला काहीच नको असेल तर पुस्तकांशी मैत्री करा आपली ओळख आपले वाचन वाढवा विविध विषयावरील नवनवीन पुस्तके शोधा किंवा पुस्तकांशी एक रूप व्हा, पुस्तकांशी मित्रता करा, आपले वाचन वाढवा त्यासाठी बाहेर ही जाण्याची गरज नाही

आपल्याच मोबाईल वरती वाचनकट्टा आहे एकाच ॲप मध्ये आपल्याला हजारो पुस्तके मिळतील ती वाचनाची सवय लावा म्हणजे आपले ज्ञानही वाढेल आणि वेळेचा सदुपयोग होईल व शासनाच्या नियमाचे पालन होईल वाचाल तर वाचाल !याप्रकारे मोठमोठे महापुरुष हे वाचनानेच महान व विद्वान बनलेले आहेत आपल्या ज्ञानाची उंची वाढवा वाढवायचे असेल आपल्याला समाजात मान, प्रतिष्ठा मिळवायचीअसेल तर आपल्याला पुस्तकावर प्रेम केलेच पाहिजे आणि ती आज योग्य वेळ आहे कुठल्याही कलेची साधना व तपश्चर्या केल्याशिवाय आपल्याला ती प्राप्त होत नाही व आपले जीवन सुखकर होत नाही

Related posts