तुळजापूर

रोहित दादा पवार विचार मंच तर्फे पोलीसांचा सन्मान.

पुरूषोत्तम विष्णु बेले,
तुळजापुर / प्रतिनिधी

दि २१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस स्मृतिदिन साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातील वीर शहीद पोलीस जवान यांच्या सन्मानार्थ रोहित दादा पवार विचार मंच तुळजापूर तालुका यांच्या वतीने नळदुर्ग पोलीस स्टेशन मधील वरीष्ठ पोलीस अधिकारी सुधीर मोटे(सहाय्यक पोलीस निरीक्षक),अमित मस्के(सहाय्यक पोलीस निरीक्षक)

डी ए वाघमारे. यांना रोहित दादा पवार विचार मंच तुळजापूर तालुका अध्यक्ष श्रीधर देवीदास नरवडे यांचे हस्ते शहीद जवान अशोक कामटे यांची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते पुरूषोत्तम बेले, रोहित शंकरशेट्टी,ओंकार नरवडे, चंद्रशेखर बोंगरगे,आदि जण उपस्थित होते.पोलीस बांधवांनी विचार मंच चे अध्यक्ष श्रीधर नरवडे यांचे आभार मानले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Related posts