पंढरपूर

माझे गाव कोरोनामुक्त गाव’ अभियान अंतर्गत नियोजन व आढावा बैठक संपन्न.

पंढरपूर –
माझे गाव कोरोनामुक्त गाव’ अभियान अंतर्गत नियोजन व आढावा बैठक पंढरपूर येथे घेण्यात आली. सर्वांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले परिपत्रक देऊन तसेच त्याचे वाचन करण्यात आले. तसेच आदेश ही अवगत करण्यात आले. शेवटी प्रतिज्ञा घेण्यात आली. पंचायत समिती सभागृह तसेच वॉर रूममधील आयोजित कार्यशाळेमध्ये मोहिमेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

मा सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी , तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, अति.गटविकास अधिकारी, पंचायत समिती सदस्य, वैद्यकीय अधिकारी, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरवरील विस्तार अधिकारी,अंगणवाडी सुपरवायझर उपस्थित होते.

Related posts