पंढरपूर

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात पंढरीत राष्ट्रवादीचा मोर्चा

सचिन झाडे
पंढरपूर (प्रतिनिधी) –

सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीस विरोध करण्यासाठी पंढरपूर राष्ट्रवादीच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर आज दि. ११ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चामध्ये दुचाकी घेऊन महिला कार्यकर्त्या देखील सामील झाल्या होत्या.

पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे महागाईचा भडका उडाला असून मध्यमवर्गीयांचे जीणे असह्य झाले आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी पंढरपूर राष्ट्रवादीच्या वतीने आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा समारोप प्रांताधिकारी कार्यालयावर झाला. नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी, अशा घोषणा देत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दुचाकी घेऊन ढकलत मोर्चामध्ये सामील झाले होते,

या मोर्चामध्ये राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुधीर भोसले, युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, युवक शहराध्यक्ष संदीप मांडवे, ओबीसी सेल जिल्हा महिलाध्यक्षा साधना राउत, कांचन खंडागळे, तसेच असंख्य कार्यकर्ते सामील होते.

Related posts