पंढरपूर

स्व.आ.भारत भालके यांच्या स्मरणार्थ पंढरीत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

N.Y.5 ग्रुप व मा.नागेश यादव मित्र परिवार यांच्या वतीने

सचिन झाडे
पंढरपूर –

स्व.आ.भारतनाना भालकें यांच्या स्मरणार्थ N.Y.ग्रुप व नगरसेवक नागेश यादव मित्र परिवार यांच्या वतीने पंढरपूर येथे राज्यस्तरिय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उद्घाटन जि.प.सदस्य व्यंकटराव भालके यांच्या हस्ते करण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी नगरसेवक महादेव धोत्रे,शंकर पवार,संजय घोडके,युवा नेते सागर यादव,किर्तीपाल सर्वगोड,संजय बंदपट्टे,विठ्ठल बंदपट्टे, स्वागत कदम,गुरु दोडिया आदि उपस्थित होते.

पंढरपूर-मगळवेढा विधानसभेचे लोकप्रिय आ.स्व.भारत भालके यांच्या स्मरणार्थ पंढरपूर येथे राज्यस्तरिय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी राज्यातील कोल्हापूर,सातारा,रायगड,नाशिक,विजापूर सह सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ५० अधिक क्रिकेट संघाने सहभाग घेतला आहे.या स्पर्धेचे प्रथम परितोषिक N.Y.ग्रुप तर्फे १,००५५५ रु.व स्व.भारत(नाना)भालके चषक, द्वितीय परितोषिक युवा नेते सागर यादव यांच्यावतीने ५०,५५५ रु.व चषक, तर तृतीय पारितोषिक नगरसेवक महादेव धोत्रे यांच्यावतीने ३०,५५५ रु व चषक विजेत्या संघांना देण्यात येणार आहे.

पंढरपूर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर क्रिडांगण येथे या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार दि.२८ जाने.रोजी वरील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

यावेळी अॅड.किशोर खिलारे,अॅड.बादाल यादव,भोला साठे,नाथा यादव,पंढरिनाथ कदम,युवक नेते लोकेश यादव,भाऊसाहेब कांबळे,दशरथ यादव,नारायण देवकुळे,राजाभाऊ देवकुळे, प्रदीप यादव,योगेश मोरे,बापू खिलारे,लहू रणदिवे,सुर्यभान वाघमारे,प्रसाद यादव, महेश सातपुते,बबलु शेख,तसेच कार्यकर्ते व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts