उस्मानाबाद  तुळजापूर

सैनिकी विद्यालयातील पांचाळ सर विविध पुरस्काराने सन्मानित ; विद्यालयाच्या वतीने करण्यात आला सत्कार.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा.

तुळजापूर – तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयातील सहशिक्षक श्री. पांचाळ सर यांना विविध पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयतील सहशिक्षक श्रीमान पांचाळ देविदास श्रीनिवासराव यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2020 – 21 देऊन गौरविण्यात आले आहे . तसेच कलानगरी वेल्फेअर सोसायटी, अमरावती यांच्या वतीने कवीरत्न पुरस्कार 2019 देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे याच वर्षी त्यांची निवड अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला उस्मानाबाद अंतर्गत तुळजापूर तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून झालेली आहे. या त्यांच्या तिहेरी यशाबद्दल श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान घोडके सर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

 

या प्रसंगी विद्यालयातील संस्कृती विभाग प्रमुख श्रीमान स्वामी सर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्रीमान डॉ. पेटकर सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती विद्यालयातील हिंदी विषय शिक्षक डॉक्टर विजय वडवराव यांनी दिली आहे.

Related posts