तुळजापूर

नंदगाव मध्ये 10 ठिकाणी पाणपोई ,वाढदिवसानिम्मित स्तुत्य कार्यक्रम

उन्हाळ्याची चाहुल लागल्याने नंदगाव येथे वेगवेगळ्या भागामध्ये युवा मित्र सागर चौगुले यांच्या वाढदिवसानिम्मित पक्षासाठी झाडावर पाणपोईची सोय केली आहे. नंदगाव येथेल युवा नेते वैभव पाटील , सचिन कोरे ,रहिम शेख , गणेश सुरवसे ,कलिम शेख यांच्या संकल्पनेतुन सामाजिक कार्यकर्ते सागर चौगुले यांच्या वाढदिवसानिम्मित नंदगाव गावामध्ये १० ठिकाणी पाणपोई उभारण्यात आले आहेत

येथे उन्हाळ्याच्या काळात पक्षाना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या भावनेने ही पाणपोई उभारण्याचा उपक्रम राबवला. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हे तरुण पाणपोई बसवण्यासाठी आले आसता शाळेचे शिक्षक यांनी तरुणाचे मनापासुन अभिनंदन केले .

आशा प्रकारचा उपक्रम राबवुन पक्षी आणी प्राणी यांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी उपलब्ध करुण देण्याचा उपक्रम नंदगाव मध्ये वेगळेपण दाखवणारा आहे .अशा शब्दांत कौतुक केले….

Related posts