उस्मानाबाद 

पं.स. सदस्य गजेंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन.

साईनाथ जगन्नाथ गवळी
तुळजापूर/उस्मानाबाद(धाराशिव)
प्रतिनिधी.


टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना खा. ओमराजे निंबाळकर व आ. कैलासदादा पाटील यांच्यासह सर्व मान्यवर, क्रिकेटप्रेमी व खेळाडू.

वडगाव (सि) ता. उस्मानाबाद (धाराशिव) येथे पंचायत समिती सदस्य श्री.गजेंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अंकुश काका मोरे प्रतिष्ठान, सिद्धेश्वर स्पोर्ट क्लब तसेच रोहन मोरे व मित्र परिवार यांच्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन धारशिवचे लोकप्रिय खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व कळंब-धाराशिवचे आमदार मा. कैलासदादा पाटील तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.


उद्घाटन प्रसंगी फलंदाजीचा आनंद घेताना खा. ओमराजे निंबाळकर.

यावेळी उपस्थित आमदार व खासदार यांनी पं.स. सदस्य मा. गजेंद्र जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत खिलाडू वृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अंकुश काका मोरे प्रतिष्ठान, सिद्धेश्वर स्पोर्ट क्लब तसेच रोहन मोरे व मित्र परिवार यांचे विशेष अभिनंदन केले. या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमदार व खासदार तसेच अनेक खेळाडूंनी क्रिकेटचा आनंद घेतला.


उद्घाटन प्रसंगी फलंदाजीचा आनंद घेताना आ. कैलासदादा पाटील.

याप्रसंगी धारशिवचे लोकप्रिय खा. ओमराजे निंबाळकर, आ. कैलासदादा पाटील, श्री. अंकुश मोरे, पं.समिती सदस्य श्री.गजेंद्र जाधव, श्री.रमेश कोरडे, मा. सरपंच श्री धोंडीराम म्हेत्रे, ग्रा.प.सदस्य श्री सुरेश जानराव, जयराम मोरे, सुरेश मुळे, लक्ष्मीकांत हजारे, बळीराम कांबळे, आबासाहेब मोरे, सुनिल पांढरे, चंद्रकांत मोरे, बाळासाहेब म्हेत्रे, अण्णासाहेब पांढरे, रोहन मोरे, बालाजी पवार, श्रीराम माळी, योगेश ताटे, राहुल म्हेत्रे, सुधीर वाडकर, रणजित मोरे, बाळासाहेब मोरे, प्रकाश मोरे, सुरज वाडकर, तुकाराम माळी, गणेश मंगरुळे तसेच ग्रामस्थ व क्रिकेट प्रेमी आदींची उपस्थिती होती.

Related posts