तुळजापूर

“अनिष्ट ३१ डिसेंबर” च्या विरोधात्मक ३ दिवस भव्य अशा पारंपरिक किर्तनमालेचे आयोजन.

श्री. तुळजाभवानी वारकरी संप्रदाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम

साईनाथ जगन्नाथ गवळी
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा
प्रतिनिधी.

भारतीय संस्कृतीत बिघाड आणणाऱ्या 31 डिसेंबर सारख्या फाजील, अनिष्ट आणि असंस्कृत कार्यक्रमाला फाटा देत भारतीय परंपरेनुसार आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे अखंडपणे जपत, श्री. तुळजाभवानी सार्वजनिक वारकरी संप्रदाय गणेशोत्सव मंडळ, पिंपळा (बु.) यांच्या तर्फे दि. 30 डिसेंबर 2020 ते 01 जानेवारी 2021 या कालावधीत भव्य किर्तनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु.) या गावामध्ये श्री. तुळजाभवानी वारकरी संप्रदाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ च्या वतीने अनिष्ट अशा ३१ डिसेंबर या पाश्चिमात्य संस्कृतीच्या विरोधात्मक आपल्या भारतीय संस्कृतीला लाभलेल्या पारंपरिक वारकरी संप्रदायाचे जतन करुन ३ दिवस भव्य अशा किर्तनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आजकालच्या तरूण पिढीमध्ये ३१ डिसेंबर म्हणजे जणू काही एक प्रकारचा सण च आहे. या दिवशी आपली तरुण पिढी ही वाया जाताना दिसत आहे. या ३१ डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर अनेक तरुण मद्याच्या आहारी जात आहेत. अशा प्रकारच्या अनिष्ट गोष्टींत विरोधात या मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे पारंपरिक पद्धतीने किर्तनमालेचे आयोजन करून एक आदर्श निर्माण केला आहे.

या किर्तनमालेच्या कालावधीत सायंकाळी 07 ते 08 या वेळेत हरिपाठ, रात्री 09 ते 11 या वेळेत कीर्तन आणि रात्री 11 नंतर हरिजागर असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या किर्तनमालेचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

◆किर्तनमालेचा तपशील◆

३०/१२/२०२० ह.भ.प. अंगद महाराज चुंगे, पिंपळा (बु.)
३१/१२/२०२० ह.भ.प. शाम महाराज कवठेकर
०१/०१/२०२१ ह.भ.प. प्रल्हाद महाराज सरडे (नांदुरी)

तरी सर्व हरिभक्तांनी या किर्तनमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

आमचे मार्गदर्शक, मा. श्री. जगन्नाथ (दाजी) गवळी-भोसले तसेच ADV गजानन चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ३१ डिसेंबर सारख्या अनिष्ठ प्रथांच्या आहारी आजचा तरुण जाऊ नये यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही या किर्तनमालेचे आयोजन केले आहे. तरी सर्व हरिभक्तांनी या किर्तनमालेचा लाभ घ्यावा.
कृष्णात (कानू) गवळी (अध्यक्ष – श्री. तुळजाभवानी वारकरी संप्रदाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पिंपळा बु.)

या मंडळाने अशा प्रकारच्या तरूणांना मद्याच्या किंवा नशेच्या आहारी घालवणाऱ्या सणाला फाटा देऊन आपल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला जपत एक आदर्श निर्माण केलेला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या मंडळातील सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा.
श्री. जगन्नाथ (दाजी) गवळी-भोसले (शिवसेना तालुकाप्रमुख, तुळजापूर.)

दरवर्षी प्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या किर्तनमालेमुळे समाजासमोर एक आदर्श उभा राहिला आहे. तरुण पिढी ही कोणत्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी न जाता हरिभक्तिमध्ये रमली तर भविष्यात याचा त्यांना नक्कीच फायदा होईल.
ADV गजानन चौगुले (जिल्हा व सत्र न्यायालय, उस्मानाबाद.)

Related posts