लोहारा

बेंडकाळ येथे सेंद्रिय शेती प्रात्यक्षिक कार्यशाळा.

लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथे दि. 31/03/2021 रोजी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पं स लोहारा यांच्या वतीने महिला किसान सशक्तिकरण परियोजना प्रकल्प व राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने बेंडकाळ येथे सेंद्रिय शेतीचे प्रदर्शन भरविण्यात आले.

या प्रदर्शनात माती परीक्षण , बियाणे उगवण क्षमता तपासणी , घरचे बियाणे साठवून ठेवण्याची पद्धत , दशपर्णी अर्क, जिवामृत , वेस्ट डि कंपोजर, अग्निअस्त्र , व्हर्मी वाश , पोषण परसबाग , रंगीत सापळे , कामगंध सापळे , गांडूळ खत , मशरूम इत्यादी सेंद्रिय शेतीचे प्रात्याक्षिक व डेमो प्रदर्शनात ठेवण्यात आले .

उमेद तालुका अभियान व्यवस्थापक श्री अमोल कासार यांनी शेतकरी महिला यांच्याशी संवाद करत बेंडकाळ येथील सेंद्रिय शेती करत असलेल्या प्रगतशील शेतकरी महिलांचे स्वत: ह शेती मधील अनुभव व मनोगत महिलानी व्यक्त केला.
तसेच उमेद तालुका कृषी व्यवस्थापक नरेंद्र गवळी सर यांनी वाढती महगाई , शेती चे प्रदूषण ,मानवी आरोग्यावर होणारा रासायनिक खताचा परिणाम , व त्याचे होणारे दुष्परिणाम यावर मात करण्यासाठी सेंद्रिय निविष्ठा च वापर करण्यावर जास्तीत जास्त भर देण्याचे व सेंद्रिय शेतीचे महत्व सांगत कमी खर्च करून जास्तीत उत्पादन व विष मुक्त अन्न काळाची गरज आहे हे त्यांनी शेतकरी महिलांना आजच्या प्रसांगी सांगीतले आहे.

या कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती चे कृषी विस्तार अधिकारी किरण निबांळकर कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी श्री बिडबाग , यांनी विविध शासकीय योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली .

तसेच उमरगा तालुक्यातील प्रभाग कृषी व्यवस्थापक श्री किशोर औरादे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व व खरीप पूर्व शेतीचे नियोजन, शेतीला कधी वेळ दिला पाहिजे शेतीचे अचूक सुत्र सांगत शेतामध्ये नैसर्गिक शेतीचे महत्व सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ जगताप तर आभार किशोर हुडेकर यांनी मानले सेंद्रिय शेतीचे प्रदर्शन भरविण्यात अथक परिश्रम व नियोजन बेंडकाळ येथील कृषी सखी लक्ष्मी कल्याण मोरे गीता गोरे प्रभाग कृषी समन्वयक प्रदीप चव्हाण कांबळे , प्रभाग कृषी व्यवस्थापक सचिन गायकवाड , किशोर हुडेकर , तसेच कानेगाव प्रभागाचे सि एल एफ मॅनेजर मंगल ताई यांनी व स्वयंम् शिक्षण प्रयोग चे तालुका कॉडिनेटर शिल्पा वेलदोडे यांनी परिश्रम घेतले.

Related posts