पंढरपूर

सोलापूर जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी संपर्क प्रमुख आ.डॉ.तानाजी सावंत यांना सक्रिय होण्याचे आदेश द्या.

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पंढरपूर विभाग शिवसेना यांनी निवेदनाद्वारे केली मागणी

सचिन झाडे
पंढरपूर

शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी गेल्या महायुतिच्या सत्ताकाळात सोलापूर जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत झाल्याचे दिसून आले.सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व सामान्य शिवसैनिक हे थेट आ.डॉ. तानाजीराव यांच्याशी सम्पर्क करून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिक सक्षमतेने कार्यरत असल्याचे दिसून आले होते.

सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचा झंजावात होता. मात्र गेल्या वर्षभरापासून जिल्हा शिवसेनेत मरगळ आल्याचे दिसून येत आहे.येऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता यात यश मिळविण्यासाठी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉ.तानाजीराव सावंत यांना पक्ष वाढीसाठी अधिक सक्रिय होण्याचे आदेश दयावेत अशी मागणी पंढरपुर विभाग व पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात शिवसेना वाढली पाहिजे यासाठी प्रचंड तळमळ असलेले नेतृत्व म्हणून जिल्हा शिवसेना संपर्क आ.तानाजी सावंत यांनी अतिशय भूमिका पार पाडली आहे.शिवसैनिकामध्ये कुठलाही भेदभाव न करता एक आक्रमक व शिस्तप्रिय नेतृत्व म्हणून त्यांनी काम केले आहे.त्यामुळे त्यांना पुन्हा सक्रिय होण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी या निवेदनात केली आहे.

या निवेदनावर शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे,माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव,शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव,शिवसेना तालुका प्रमुख महावीर देशमुख,शहर प्रमुख रवी मुळे यांच्या सह्या केलेले पत्र आहे.

Related posts