पंढरपूर

आदेशान्वये केंद्र व राज्य शासनाने लागू केलेल्या लॉक डाऊन हटविण्यात यावा

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये केंद्र व राज्य शासनाने लागू केलेल्या लॉक डाऊन हटविण्यात यावा. यासह विविध मागण्यांसाठी डफली बजाओ आंदोलन करण्यात येत आहे.
या अनुषंगाने पंढरपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बुधवारी डफली बजाओ आंदोलन करण्यात आले.

यावेळी केंद्र व राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक छोटे-मोठे व्यापारी,बांधकाम मजूर व व्यावसायिक तसेच गोरगरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
केंद्र व राज्य शासनाने तात्काळ लॉक डाऊन हटवून बससेवा तसेच छोटे-मोठे व्यवसाय सुरळीत करण्यात यावे. या प्रमुख मागण्यांसाठी पंढरपूर येथे डफली बजाव आंदोलन करण्यात आले .
यावेळी रिपब्लिकन सेना युवा जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड, शहराध्यक्ष रवींद्र सर्वगोड, कपिल बनसोडे आदी उपस्थित होते.

Related posts