कविता 

अग्निपरीक्षा

सध्याचा काळ गड्यानो
खुप घातक आहे
जवळच्यानीच जवळच्याचा
घात होतो आहे!
सैनिटाइजर,मास्क चे
बंधन पाळा, मानवाचा
भयंकर शत्रु कोरोणा
विषानुला टाळा!
माणसामाणसात अंतर
ठेवा!बाजार,यात्रा,
लग्न समारंभ गर्दिच्या
कार्यक्रमाला घाला आळा,
स्वताला जपा,कुटुंब वाचवा
मी असा, मी तसा,सोडा
गेलेली वेळ पुन्हा येत नाही
लाखो लोकांनी आपल्या
समोर जगाचा निरोप घेतलाय!
थोड़ आवरा स्वताला
ही जगण्या मरण्याची
आहे दिव्य अग्निपरिक्षा!

=========================================================================================

कवि
देविदास पांचाळ सर
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापुर। जिल्हा उस्मानाबाद।।

Related posts