उस्मानाबाद 

ढोकी गावातून रेल्वेस्टेशनला जाणारा जुना रस्ता खुला करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

याबाबत सविस्तर माहिती अशी की उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथील रेल्वे स्टेशनला जाणारा जुना रस्ता हा खूप दिवसापासून बंद आहे..

उस्मानाबाद चे जिल्हाधिकारी साहेबांनी जुने रस्ते खुले करण्याचे आदेश दिले आहेत.तरी हा रस्ता अद्यापही बंद आहे..

याचा विचार करून ढोकी गावातून रेल्वे स्टेशनला जाणारा जुना रस्ता खुला करावा जेणे करून येथील रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी तसेच तेर येथे गोरोबाकाकांच्या वारीला जाणारे भक्त यांनाही याचा फायदा होईल.

तरी आपण याचा विचार करून वरील रस्ता लवकरात लवकर खुला करून द्यावा अशी मागणी मनसे चे तालुका उपाध्यक्ष सलीम औटी यांनी ढोकी चे तलाठी यांच्याकडे केली आहे..

आज हे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप तालुका अध्यक्ष सलिम औटी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले..

या वेळी उपस्थित काकासाहेब पाटील आबरार काझी जमीर औटी सुलतान काझी हजर होते

ढोकी रेल्वेस्टेशन ला जाणारा रस्ता खूप दिवसांपासून बंद आहे हा रस्ता लवकरात लवकर सुरू करावा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल..

सलीम औटी,तालुका उपाध्यक्ष मनसे उस्मानाबाद

Related posts