पंढरपूर

राज्यातील मंदिरे खुली करा; भाजपाचे विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन.

पंढरपूर / प्रतिनिधी
मदिर बंद उघडले बार उध्दवा धुंद तुझे सरकार म्हणत राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी पंढरीत भाजपाचे पंढरीच्या पांडुरंगा समोर आंदोलन.
आंदोलन स्थळावरून पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वादाने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यानंतर आंदोलकांनी मंदिरासमोरच ठिय्या मारून भजन, कीर्तन करून आंदोलन करण्यात आले.
राज्यातील मंदिरे खुली करावी या मागणीसाठी  मंगळवारी पंढरपुरात विठ्ठल मंदिरासमोर भाजपाच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. मंगळवारी कमला एकादशी निमित्त विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आंदोलन स्थळावरून पोलिस अधिकारी आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यामध्ये वादावादी झाली. यामुळे काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. 

काही काळानंतर विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरी समोरच भाजपा कार्यकर्त्यांनी ठिय्या मारून भजन, किर्तन करुन राज्यातील मंदिरे उघडण्याची सरकारकडे मागणी केली. 
संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील सर्व मंदिरे राज्य सरकारने येत्या पंधरा दिवसात खुली न केल्यास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासा समोर आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, भाजपाचे उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, गटनेते गुरुदास अभ्यंकर, जेष्ठ नेत्या शकुंतला नडगिरे, शिरीष कटेकर, बादल ठाकुर यांच्यासह भाजपाच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts