पंढरपूर

विठ्ठलाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर फवारण्याची केवळ समाजमाध्यमातील चर्चा … ज्ञानेश्वर जळगावकर महाराज

सचिन झाडे पंढरपूर प्रतिनिधी 

– देशातील काही प्रमुख मंदिरे उघडल्यानंतर आता पंढरपूरचेही श्री विठ्ठल – रुक्‍मिणी मंदिर दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. त्यातच देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर फवारण्याची चर्चा सुरू झाल्याने वारकरी संप्रदायामध्ये मोठी खळबळ उडाली आहेदेवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर फवारण्याची कुठेही अधिकृत चर्चा झाली नाही. केवळ समाज माध्यमातून चर्चा सुरू आहे. देवाच्या पायावर सॅनिटायझर मारण्याचा विषय आलाच तर वारकरी म्हणून आमचा विरोध राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. ]

दरम्यान, भाविकांना देवाचे मुखदर्शन सुरू करावे, अशी मागणीही ज्ञानेश्वर जळगावकर महाराज यांनी केली आहे.राज्य सरकारने धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिल्यानंतर विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन काही दिवस बंद ठेवले तरी चालेल, मात्र देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर टाकण्यास आमचा ठाम विरोध राहील, अशी भूमिका देखील त्यानी मांडली आहे. तसेच दर्शनाचा वाद आणि देवाच्या पायावर सॅनिटायझर न फवारता काही दिवस मुखदर्शन सुरू करावे अशी मागणी पुढे येत आहे.

Related posts